बेशिस्त वर्तन खपवून घेतले जाणार नाही : पीआय नागरे

मिरवणुकीचे प्रत्यकाने पावित्र्य जपावे

बेशिस्त वर्तन खपवून घेतले जाणार नाही : पीआय नागरे

प्रतिनिधी / रावेर 

उत्सव साजरा करतांना काढण्यात येणाऱ्या मिरवणुकीचे प्रत्येकाने पावित्र्य जपावे. मिरवणुकीत बेशिस्त वर्तन खपवून घेतले जाणार नाही, पोलीस कोणाचीही गय करणार नाहीत असा इशारा पोलीस निरीक्षक कैलास नागरे यांनी दिला. 

मोहरम सणाच्या पार्श्वभूमीवर येथील पोलीस ठाण्यात शांतता समितीची बैठक आयोजित करण्यात आली होती.  त्यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करताना नागरे बोलत होते. यावेळी मोहरम उत्सव समितीचे अध्यक्ष शेख सादिक, उपनिरीक्षक राजेंद्र करोडपती, पोलीस कर्मचारी पुरुषोत्तम पाटील, बिजू जावरे उपस्थित होते. मिरवणुकीवर पोलिसांचे बारीक लक्ष असणार आहे. सर्वांनी उत्सव शांततेत व आनंदाने पार पडावा. गोंधळ घालणाऱ्या व गैरवर्तणूक करणाऱ्यांवर उत्सव समिती तसेच पंच कमिटीच्या पदाधिकाऱ्यानी लक्ष ठेवावे असे आवाहन नागरे यांनी यावेळी केले. मिरवणुकीत बेशिस्तपणे वागणाऱ्यांची कोणत्याही परिस्थितीत गय केली जाणार नाही. अशा व्यक्तींवर कडक कारवाई करण्याचा इशारा पोलीस निरीक्षक नागरे यांनी दिला. बैठकीला माजी नगरसेवक असिफ मोहम्मद, गयास शेख, युनूस खान, गयासुद्दीन काझी, रफिक शेख, असद शेख, यांच्यासह नागरिक उपस्थित होते.