कृषीसेवक राज्यस्तरीय पुरस्कार सोहळा नोव्हेंबरमध्ये : रावेरात मान्यवरांच्या हस्ते होणार भूमिपुत्रांचा गौरव
रावेरात भूमिपुत्रांचा गौरव
महाराष्ट्र राज्यातील शेती व शेतीशी संबधीत क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व समाजासाठी प्रेरक ठरणाऱ्या भूमिपुत्रांना दरवर्षी साप्ताहिक कृषिसेवकतर्फे राज्यस्तरीय पुरस्काराने गौरविण्यात येते. यंदाचे पुरस्काराचे हे सहावे वर्ष आहे. या पुरस्काराचे वितरण नोव्हेंबर २०२३ मध्ये रावेर ता. रावेर जि. जळगाव येथे आयोजीत कार्यक्रमात करण्यात येणार आहे.
उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींना मान्यवरांच्या हस्ते व उपस्थितीत पुष्पगुच्छ, सन्मानपत्र, स्मृतीचिन्ह देवून गौरव करण्यात येणार आहे. या कार्यक्रमाचे आयोजन साप्ताहिक कृषिसेवकच्या वर्धापन दिनानिमित्त प्रेरणादायी भूमिपुत्रांचा पुरस्कार देऊन गौरव करण्याची कृषीसेवकची परंपरा आहे. *आदर्श शेतकरी, आदर्श महीला शेतकरी, आदर्श युवा शेतकरी, आदर्श कृषी शास्त्रज्ञ, आदर्श कृषी तज्ञ, आदर्श कृषी उद्योजक, आदर्श कृषी मित्र, आदर्श कृषी विज्ञान केंद्र, आदर्श कृषी विज्ञान मंडळ/आदर्श शेतकरी कंपनी/आदर्श शेतकरी गट, आदर्श कृषी व्यावसायिक* या विविध दहा गटातून पुरस्कार दिले जाणार आहेत. पुरस्कारासाठी महाराष्ट्र राज्यातील वरील गटातील इच्छुकांकडून प्रस्ताव मागविण्यात आले आहेत. स्वतःच्या कार्याची संपूर्ण माहिती व फोटोसह इच्छुकांनी ३० जून २०२३ पर्यंत त्यांचे प्रस्ताव ९४०४२४३५१५ या व्हाट्स अप क्रमांकावर किंवा krushisevak2014@gmail.com या ईमेल आयडीवर पाठवावेत. निवड झालेल्या पुरस्कारार्थिंच्या कार्याचा आढावा असलेला विशेषांक पुरस्कार वितरण कार्यक्रमावेळी मान्यवरांच्या हस्ते प्रकाशित केला जाणार आहे. पुरस्कारासाठी निवड करण्यात आलेल्या पुरस्कारार्थिंना जुलै अखेरपर्यंत स्वतंत्रपणे कळविण्यात येईल. तसेच साप्ताहिक कृषिसेवक अंकातून ही यादी प्रकाशित करण्यात येणार आहे.
*संपर्क-- 9404242515*
email -krushisevak2014@gmail.com