रावेर व सावदा बाजार समितीत सोमवारी भूमिपूजन

शॉपिंग कॉम्प्लेक्स, संरक्षण भिंत व पाण्याच्या टाकीचे होणार बांधकाम

रावेर व सावदा बाजार समितीत सोमवारी भूमिपूजन

प्रतिनिधी / रावेर 

रावेर येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात तसेच सावदा उप बाजार समितीच्या आवारात दुकाने, शॉपिंग कॉम्प्लेक्स, संरक्षण भिंत व पाण्याची टाकी बांधण्यासाठी भूमिपूजन कार्यक्रम सोमवारी दि ११ रोजी संपन्न होत आहे. रावेर येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात दुकाने, संरक्षण भिंत व पाण्याची टाकी तसेच सावदा येथील उप बाजार समितीच्या आवारात शॉपिंग कॉम्प्लेक्स व भूमिगत पाण्याच्या टाकीचे बांधकाम करण्यात येणार आहे. या कामांचे भूमिपूजन ११ मार्चला होणार आहे. रावेर येथील कामांचे भूमिपूजन बाजार समितीचे सभापती सचिन पाटील यांच्या हस्ते तर सावदा येथील भूमिपूजन उप सभापती योगेश पाटील यांच्या हस्ते संपन्न होणार आहे. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बाजार समितीचे जेष्ठ संचालक डॉ राजेंद्र पाटील असतील. रावेर येथे सकाळी ११ वाजता तर सावदा येथे दुपारी २ वाजता या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.