9 वा पुरस्कार गौरव : जानेवारीत होणार राज्यस्तरीय कृषीसेवक पुरस्कार सन्मान सोहळा
विविध गटातून प्रस्ताव मागवले
प्रतिनिधी/रावेर
“शेतकऱ्यांच्या समृद्धीसाठी” हे ब्रीदवाक्य वाक्य घेवून साप्ताहिक कृषीसेवकचे गेल्या 12 वर्षापासून राज्यात कृषी विस्ताराचे कार्य अखंडितपणे सुरु आहे. वर्धापनदिनाचे औचित्य साधून शेती व शेतीशी निगडीत क्षेत्रात महाराष्ट्रात उत्कृष्ट कार्य करणाऱ्या प्रेरणादायी व्यक्तींना राज्यस्तरीय कृषीसेवक पुरस्कार प्रदान करून सन्मानित करण्यात येते. गेल्या आठ वर्षात राज्यातील सुमारे 350 व्यक्तींना आतापर्यंत केंद्रीय राज्यमंत्री रक्षाताई खडसे, माजी मंत्री श्री एकनाथराव खडसे, राज्य मूल्य आयोगाचे अध्यक्ष श्री पाशा पटेल. आमदार अमोल जावळे, शेतकरी नेते व तत्कालीन राष्ट्रवादी किसान सेलचे प्रदेशाध्यक्ष श्री शंकरअण्णा धोंडगे, क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष व शेतकरी नेते श्री रविकांत तुपकर, अग्री सर्च इंडिया प्रा लिमिटेड उद्योगाचे व्यवस्थापकीय संचालक श्री प्रदीप कोठावदे, जैन इरिगेशनचे उपाध्यक्ष तथा जेष्ठ केळी तज्ञ श्री डॉ के बी पाटील, माजी खासदार श्री डॉ उल्हास पाटील, माजी आमदार श्री अरुण पाटील, माजी आमदार शिरीष चौधरी, तत्कालीन आमदार कृषिमित्र स्व. हरिभाऊ जावळे, तत्कालीन कृषी सह संचालक श्री अनिल भोकरे, उद्योजक श्रीराम पाटील, डॉ प्रशांत सरोदे, युगंधर पवार यांच्या हस्ते पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेले आहे.
शेती व शेतीशी निगडीत क्षेत्रात स्वकर्तृत्वाने नाविन्यपूर्ण प्रयोग करणारे अनेक भूमिपुत्र राज्यात आहेत. अशा प्रेरणादायी कृषी क्षेत्रातील व्यक्तींना जानेवारी-2027 मध्ये रावेर ता रावेर जि जळगाव येथे राज्यस्तरीय कृषीसेवक पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे. यंदाचा हा 9 वा राज्यस्तरीय कृषीसेवक पुरस्कार वितरण सोहळा आहे. यासाठी राज्यभरातून शेतकरी, महिला शेतकरी, युवा शेतकरी , कृषीशास्त्रज्ञ, कृषी तज्ञ, कृषी मित्र, कृषी उद्योजक, कृषी लेखक व कृषी संस्था या गटातून पुरस्कारासाठी प्रस्ताव मागविण्यात आले आहेत. निवड झालेल्या पुरस्कारारार्थींच्या कार्याचा आढावा व परिचय असलेया गौरव विशेषांकाचे प्रकाशन या सोहळ्यात मान्यवरांच्या हस्ते करण्यात येणार आहे. इच्छुकांनी आपले प्रस्ताव 30 नोव्हेंबर 2026 पर्यंत krushisevak2014@gmail.com या ई-मेलवर किंवा 9404243515 या व्हाटसऑप नंबरवर पाठवावेत. (संपर्क – कृष्णा पाटील, संपादक, साप्ताहिक कृषीसेवक मो 9404243515, 9011119504 )

krushisewak 
