कृषीसेवक राज्यस्तरीय पुरस्कार-२०२३ प्राथमिक निवड यादी जाहीर : २६ नोव्हेंबरला रावेरला सन्मान सोहळा
अंतिम यादी १५ ऑक्टोबरला होणार जाहीर
कृषीसेवक न्यूज नेटवर्क
रावेर ता रावेर जि जळगाव येथे २६ नोव्हेंबरला साप्ताहिक कृषीसेवकच्या वर्धापन दिनानिमित्त राज्यस्तरीय पुरस्कार सन्मान सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. या ६ व्या पुरस्कार वितरण व सन्मान सोहळ्यासाठी निवड झालेल्या राज्यभरातील विविध गटातील पुरस्कारार्थींची प्राथमिक निवड यादी जाहीर करण्यात आली आहे. ही प्राथमिक यादी असून काही कारणास्तव यात बदल होऊ शकतो, त्यामुळे अंतिम निवड यादी जाहीर झाल्यावर निवड झालेल्या पुरस्कारार्थीना वैयक्तिकपणे पत्राद्वारे कळविण्यात येईल. निवड झालेल्या पुरस्कारार्थींच्या नावाची *अंतिम यादी १५ ऑक्टोबरला जाहीर* करण्यात येणार आहे. *(संपर्कासाठी कृष्णा पाटील संपादक साप्ताहिक कृषीसेवक मोबाईल ९४०४२४३५१५)*
जाहीर करण्यात आलेली प्राथमिक निवड यादी पुढीलप्रमाणे -
*कृषीरत्न कृषीसेवक पुरस्कार* - केदार रमेश कुलकर्णी रा. तांबोळे ता मोहोळ जि सोलापूर, विकास हरिभाऊ चव्हाण रा. पारगाव-मंगरूळ ता जुन्नर जि पुणे
*शेतकरी कृषीसेवक पुरस्कार*- बळवंतराव देवराव पऊळ रा. बनचिंचोली ता हादगाव जि नांदेड, हर्षद प्रकाश पाटील रा. वेढी ता जि पालघर, गणेश उत्तमराव पाटील रा. चोरवड ता पारोळा जि जळगाव, शशिभूषण भाऊरावजी उमेकर रा. टेंभूरखेडा ता वरुड जि अमरावती, हेमंत वसंतराव देशमुख रा. डोंगरकिन्ही ता मालेगाव जि वाशीम
*महिला शेतकरी कृषीसेवक पुरस्कार*- सौ पूजा अजय ढोक रा. इंझोरी ता मानोरा जि वाशीम
*आदर्श युवा शेतकरी पुरस्कार*- अनिल शिवलाल किरणापुरे रा लवारी ता साकोली जि भंडारा, रतिलाल कामा पावरा रा रावळपाणी ता तळोदा जि नंदुरबार, प्रतीक एकनाथ साबे रा आडविहीर ता मोताळा जि बुलडाणा, सचिन सुधाकर नरोडे रा शिलेगाव ता गंगापूर जि छत्रपती संभाजीनगर, मिलिंद रामदास पाटील रा निंबोल ता रावेर जि जळगाव, बाबुराव माणिकराव सलगर रा मलनाथपूर ता परळी वैजनाथ जि बीड.
*कृषी शास्त्रज्ञ कृषीसेवक पुरस्कार*- डॉ दादासाहेब खोगरे रा ईडा ता भूम जि धाराशिव , डॉ जयंत सर्जेराव घाटगे रा. तळसंदे जि कोल्हापूर, डॉ बी बी गायकवाड तुळजापूर, डॉ कुणाल माहोरकर रा कोंडोली ता मानोरा जि वाशीम
* कृषी तज्ज्ञ कृषीसेवक पुरस्कार*- विवेक प्रल्हाद बोन्डे रा निंभोरा ता रावेर जि जळगाव, डॉ गणेश बाळकृष्ण अडसूळ फलटण जि सातारा, सोज्वळ शालिकराम शिंदे रा वाघोळी बुद्रुक ता जि वाशीम, सुरज रंगनाथ उगले फर्दापूर ता सिन्नर जि नाशिक, डॉ एच एस गरुड परभणी.
*आदर्श कृषी मित्र पुरस्कार*- मनोज संतोष कदम फाळकेवाडी ता महाड जि रायगड, शरद ज्ञानदेव देवेकर (देवेकर ऍग्रो) रा. बसरेवाडी ता भुदरगड जि कोल्हापूर, वसंतराव पुंजाजी शिंदे रा नांदूर खुर्द ता निफाड जि नाशिक
*आदर्श कृषी उद्योजक पुरस्कार*- मल्हार प्रल्हाद कुंभार रा चोरवड ता पारोळा जि जळगाव सौ दीपाली दीपक तळेले मीरारोड मुंबई , सौ उज्ज्वला अनिल गोसावी पुणे ,