CRIME रावेर –पाल रस्त्यावर गावठी पिस्तूल विक्रीसाठी येणाऱ्यास अटक : पिस्तुलासह दोन काडतुसे जप्त

गुन्हे शोध पथकाची कारवाई

CRIME रावेर –पाल रस्त्यावर गावठी पिस्तूल विक्रीसाठी येणाऱ्यास अटक : पिस्तुलासह दोन काडतुसे जप्त

 

प्रतिनिधी / रावेर

गावठी पिस्तूल विक्रीच्या उद्देशाने येणाऱ्या एकास पोलिसांनी रावेर-पाल रस्त्यावर सापळा लावून पकडले असून त्याच्याकडून एक गावठी बनावटीचे पिस्तुल व दोन जिवंत काडतुसे असा २२ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला केली आहे. याप्रकरणी अब्दुल अनिस अब्दुल मज्जीद रा बडी खानका, मुस्लीम कॉलनी, खडका रोड भुसावळ यास अटक करण्यात आली आहे.

पोलीस निरीक्षक डॉ विशाल जयस्वाल यांना मिळालेल्या गुप्त माहितीवरून गुन्हे शोध पथकातील उपनिरीक्षक तुषार पाटील, पोलीस कर्मचारी विष्णू बिऱ्हाले, विनोद पाटील, ईश्वर देशमुख, राहुल महाजन,  रवींद्र वंजारी, सचिन घुगे, प्रमोद पाटील, विशाल पाटील, महेश मोगरे यांचे पथक तयार केले.  त्यांना रावेर पाल रस्त्यावरील कुसुंबा ते लालमाती दरम्यान असलेल्या जल्लालशहा बाबांच्या दर्ग्यासमोर एक व्यक्ती गावठी पिस्तूल विक्रीसाठी येणार असल्याची माहिती दिली. त्यानुसार वरील पथकातील कर्मचाऱ्यांनी सापळा लावला. आरोपी टप्प्यात येताच त्याची चौकशी केली असता व पोलिसांनी घेतलेल्या अंग झडतीत त्याच्याकडून एक गावठी पिस्तूल व दोन जिवंत काडतूस मिळून आले. रावेर पोलीस ठाण्यात आरोपी अब्दुल अनिस अब्दुल मज्जीद विरुद्ध  गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास उप निरीक्षक तुषार पाटील करीत आहेत.