आरक्षण सोडत : रावेर तालुक्यातील 42 गावात येणार महिलाराज : अनेकांच्या स्वप्नांचा चुराडा तर अनेकांना राजयोगाची संधी

८२ गावांचे आरक्षण सोडत

आरक्षण सोडत : रावेर तालुक्यातील 42 गावात येणार महिलाराज : अनेकांच्या स्वप्नांचा चुराडा तर अनेकांना राजयोगाची संधी

प्रतिनिधी / रावेर

रावेर तालुक्यातील सन २०२५ ते २०३० या कालावधीत मुदती संपणाऱ्या ग्रामपंचायतीसाठी आज आरक्षण काढण्यात आले. तहसील कार्यालयात दुपारी चार वाजता प्रांताधिकारी बबनराव काकडे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या सभेत महिला आरक्षण काढण्यात आले. आरक्षणामुळे रावेर तालुक्यातील एकूण ८२ पैकी ४१ ग्रामपंचायती महिलांच्या हाती येणार आहेत. महिला आरक्षणामुळे अनेक इच्छुकांच्या स्वप्नांवर पाणी फिरले असून  नवख्याना राजयोगाची संधी यामुळे उपलब्ध होणार आहे.  सकाळी अकरा वाजता तहसीलदार बी ए कापसे यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित सभेत एकूण ८२ ग्रामपंचायतीसाठी आरक्षण काढण्यात आले. यावेळी व्यासपीठावर निवासी नायब तहसीलदार संजय तायडे, ग्राम विस्तार अधिकारी श्री आढांगले, भूषण कांबळे उपस्थित होते. यावेळी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती सचिन पाटील, भाजपचे तालुकाध्यक्ष एड सुर्यकांत पाटील, रवींद्र पाटील, कॉंग्रेसचे तालुकाध्यक्ष डॉ राजेंद्र पाटील, बाजार समितीचे संचालक मंदार पाटील, सी एस पाटील, अहमद तडवी, दुर्गादास पाटील, विजय महाजन यांच्यासह उपस्थित होते.  

ग्रामपंचायत निहाय आरक्षण पुढीलप्रमाणे :

अनुसूचित जाती (१३) ; पाडले खुर्द, खिरोदा प्र. रावेर, कुंभारखेडा(स्त्री), वाघोदे खुर्द, खानापूर(स्त्री), मांगी-चुनवाडे(स्त्री), कळमोदे(स्त्री), सावखेडा बुद्रुक(स्त्री), मुंजलवाडी, गहुखेडा, मस्कावद बुद्रुक, धामोडी(स्त्री), विवरे खुर्द(स्त्री).

अनुसूचित जमाती (११) : चिनावल(स्त्री), मस्कावद सीम, भोर(स्त्री), सुदगाव, कोचुर बुद्रुक(स्त्री), निरूळ, दोधे(स्त्री), थेरोळे(स्त्री), नेहेते, पुनखेडा, वाघोड(स्त्री).   

नागरिकांचा मागास प्रवर्ग (२२ ): उटखेडा(स्त्री), वाघोदा बुद्रुक, कर्जोद, रणगाव(स्त्री), तासखेडा(स्त्री), अहिरवाडी(स्त्री), सुनोदा, रमजीपुर(स्त्री) आंदळवाडी(स्त्री), वाघाडी, अजनाड-चोरवड(स्त्री), थोरगव्हाण, खिर्डी खुर्द(स्त्री), खिर्डी बुद्रुक, विवरे बुद्रुक, निंभोरा बुद्रुक(स्त्री), अजंदे , धुरखेडा(स्त्री), दसनूर-सिंगनूर, सिंगत, गौरखेडा(स्त्री), बलवाडी. 

सर्वसाधारण(18) : भातखेडा, खिरोदा प्र. यावल, रसलपूर, निंबोल(स्त्री), बक्षीपूर(स्त्री), मोरगाव बुद्रुक(स्त्री), भोकरी(स्त्री), कोळोदे(स्त्री), पुरी-गोलवाडे(स्त्री), केऱ्हाळे खुर्द, नांदूरखेडा, सावखेडा खुर्द(स्त्री), वडगाव(स्त्री), केऱ्हाळे बुद्रुक, उदळी-लूमखेडा, रोझोदे(स्त्री), विटवे(स्त्री), तांदलवाडी(), तामसवाडी-बोरखेडा, ऐनपूर(स्त्री), उदळी खुर्द(स्त्री), शिंगाडी(स्त्री), मस्कावद खुर्द(स्त्री), मोरगाव खुर्द, खिरवड, अटवाडे, गाते(स्त्री), पातोंडी, कोचुर खुर्द(स्त्री), मांगलवाडी, सुलवाडी, रेंभोटा, निंभोरासीम, कांडवेल, शिंदखेडा(स्त्री), रायपुर(स्त्री) .