रावेरला ठिबक,अवजारे विक्रेत्यांसह शेतकऱ्यांचा मंगळवारी मेळावा
उपस्थितीचे कृषी अधिकाऱ्यांचे आवाहन
कृषीसेवक न्यूज नेटवर्क/रावेर
रावेर तालुक्यातील ठिबक संच, कृषी यंत्र व अवजारे विक्रेते व शेतकऱ्यांच्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी मंगळवारी दि ७ रोजी कृषी विभागातर्फे येथील बऱ्हाणपूर रस्त्यावरील मंगलम लॉन येथे सकाळी दहा वाजता संयुक्त मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.
रावेर तालुक्यातील शेतकऱ्यांची महाडीबीटी (maha DBT) पोर्टलवर व प्रधान मंत्री सूक्ष्म सिंचन योजना, कृषी यांत्रिकीकरण योजनेत निवड झालेल्या तसेच अर्ज केलेल्या लाभार्थ्यांच्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्या सूचनेवरून या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. या मेळाव्याला तालुक्यातील सर्व ठिबक सिंचन संच विक्रेते, कृषी यंत्र व अवजारे विक्रेते तसेच शेतकरी बांधवांनी उपस्थित राहावे असे आवाहन तालुका कृषी अधिकारी भाऊसाहेब वाळके यांनी केले आहे.