BREKING : माजी आमदार अरुण पाटील यांच्यासह समर्थकांचा भाजपमध्ये प्रवेश : रावेर तालुक्यात राष्ट्रवादी शरद पवार गटाला खिंडार

पुन्हा स्वगृही परतणार

BREKING : माजी आमदार अरुण पाटील यांच्यासह समर्थकांचा भाजपमध्ये प्रवेश : रावेर तालुक्यात राष्ट्रवादी शरद पवार गटाला खिंडार

प्रतिनिधी/रावेर

रावेरचे राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार गटाचे माजी आमदार अरुण पाटील यांचा समर्थकांसह आज मुंबई येथील भाजपच्या प्रदेश कार्यालयात जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण व पक्षाच्या जेष्ठ नेत्यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश करीत आहेत. यामुळे रावेर तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाला खिंडार पडले आहे. माजी आमदार श्री पाटील यांनी दोन वेळा भाजपचे रावेर विधानसभा मतदार संघांचे प्रतिनिधित्व केलेले आहे. मात्र त्यानंतर 2009 त्यांनी भाजप सोडत राष्ट्रवादी पक्षात प्रवेश केला होता. आज पुन्हा ते भाजप मध्ये प्रवेश करीत आहेत