कब्बडीतून जीवनात स्फूर्ती निर्माण करण्याची संधी : आमदार शिरीष चौधरी यांनी व्यक्त केला विश्वास

रावेर येथे तीन दिवसीय कबड्डी स्पर्धेला शानदार सुरूवात

कब्बडीतून जीवनात स्फूर्ती निर्माण करण्याची संधी : आमदार शिरीष चौधरी यांनी व्यक्त केला विश्वास

प्रतिनिधी /रावेर

युवा शक्तीला कसब, चपळता याद्वारे जीवनात स्फूर्ती निर्माण करण्याची संधी कब्बडी या खेळातून मिळते असा विश्वास आमदार शिरीष चौधरी यांनी व्यक्त केला. रावेर येथील यशवंत विद्यालयाच्या प्रांगणात आयोजित जिल्हा कब्बडी असोसिएशन तर्फे आयोजित आमदार चषक कब्बडी स्पर्धेचे उद्घाटन करतांना आमदार चौधरी उपस्थित खेळाडूंना मार्गदर्शन करताना बोलत होते. 

प्रतिमा पूजन करून स्पर्धेला सुरूवात करण्यात आली. यावेळी व्यासपीठावर बऱ्हाणपूरचे आमदार सुरेंद्रसिंह ठाकुर, उद्योजक श्रीराम पाटील, सोपान पाटील, बाजार समितीचे सभापती सचीन पाटील, उप सभापती योगेश पाटील, अंबिका व्यायाम शाळेचे अध्यक्ष भास्कर महाजन, बाजार समितीचे संचालक गणेश महाजन, डॉ राजेंद्र पाटील, पीपल्स बँकेचे संचालक सोपान साहेबराव पाटील, अनिल अग्रवाल, माजी नगराध्यक्ष हरीश गणवणी, जे के पाटील, धनजय चौधरी यांच्यासह असंख्य मान्यवर उपस्थित होते. यावेळी आमदार सुरेंद्रसिंह ठाकुर व उद्योजक श्रीराम पाटील यांनी मनोगत व्यक्त केले. प्रास्ताविक युवराज माळी यांनी तर सूत्र संचलन भूषण चौधरी यांनी केले. 

५० संघ उपस्थित

तीन दिवस चालणाऱ्या या स्पर्धेसाठी १६ वर्षा आतील जिल्ह्यातील ४० मुलांचे तर १० मुलींचे असे ५० संघ उपस्थित झालेले असल्याची माहिती आयोजक व प्रशिक्षक युवराज माळी यांनी दिली

.