BREKING NEWS : रावेर पंचायत समितीकडून जयंतीदिनी राष्ट्रपुरुषांचा अवमान : स्वामी विवेकानंदांच्या मूर्तीची अवहेलना : जयंतीदिनी विवेकानंदांची मूर्ती पंचायत समितीच्या अडगळीत धूळखात पडून : रावेरमध्ये येवूनही जिल्हा परिषदेच्या सीईओंचे दुर्लक्ष
राष्ट्रीय युवा दिनालाही तिलांजली : अधिकाऱ्यांवर कारवाईची जनतेची मागणी
कृष्णा पाटील / रावेर
देशातील युवकांचे प्रेरणास्थान असलेल्या स्वामी विवेकानंद यांचा १२ जानेवारी हा जन्मदिन. स्वमी विवेकानंद यांचे राष्ट्र उभारणीचे सकारात्मक विचार युवकांसाठी वर्षानुवर्षापासून प्रेरणा देत आहेत. त्यामुळे १९८४ मध्ये स्वमी विवेकानंद यांची जयंती राष्ट्रीय युवा दिन म्हणून साजरी करण्याचा निर्णय केंद्र सरकारतर्फे घेण्यात आला होता. तेव्हापासून महापुरुष स्वामी विवेकानंद यांचा जन्मदिन हा राष्ट्रीय युवा दिन म्हणून सर्व शासकीय व निमशासकीय कार्यालयात साजरा केला जातो. आज देशभरात स्वामी विवेकानंद यांची जयंती विविध कार्यक्रमांनी साजरी केली जात असताना रावेर पंचायत समितीत मात्र या महापुरुषाच्या मूर्तीचा अवमान व अवहेलना झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. रावेर पंचायत समितीत असलेली सुमारे तीन फुट उंचीची स्वामी विवेकानंद यांची मूर्ती पंचायत समितीत धूळखात अडगळीत पडलेली असल्याचे दिसून आले आहे. दरम्यान जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अंकित आज एका कार्यक्रमासाठी रावेरमध्ये आले होते. मात्र रावेरमध्ये येवूनही त्यांनी पंचायत समितीत फिरकूनही पहिले नाही. युवकांचे प्रेरणास्थान असलेल्या स्वामी विवेकानंदांच्या जयंतीदिनी पंचायत समितीच्या अधिकाऱ्यांकडून त्यांच्या मूर्तीचा अवमान व अवहेलना झाल्यामुळे पंचायत समितीच्या कारभाराबाबत युवकांसह नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे.
आज १२ जानेवारी स्वामी विवेकानंद यांचा जन्मदिवस आहे. स्वामी विवेकानंदांचा जन्मदिवस भारतात राष्ट्रीय युवा दिवस म्हणून साजरा केला जातो. धर्म, मानवता, स्वातंत्र्य, वेदान्त तत्वज्ञान या सारख्या इतर अनेक विषयांवर त्यांचे विचार नेहमीच प्रत्येक भारतीयाला मार्गदर्शक ठरतात. अशा थोर राष्ट्रपुरुष स्वामी विवेकानंदांची येथील पंचायत समितीत सुमारे तीन फुट उंचीची मूर्ती आहे. पंचायत समितीच्या नवीन इमारतीचे बांधकाम सुरु असताना जुन्या सभागृहात प्रशासकीय कामकाज सुरु होते. तेव्हापासून हि मूर्ती पंचायत समितीच्या जुन्या सभागृहात आहे. मात्र नवीन इमारतीत कार्यालायचे स्थलांतर झाल्यावर तत्कालीन अधिकारी व कर्मचाऱ्यांनी या थोर पुरुषांच्या मूर्तीकडे लक्ष न दिल्याने अद्यापही हि मूर्ती याच सभागृहात अडगळीच्या ठिकाणी वर्षानुवर्षापासून धूळखात कचऱ्यात पडून आहे. स्वमी विवेकानंदांच्या जयंती दिनी तरी अधिकाऱ्यांना जाग येईल व हि मूर्ती मुख कार्यालयात आणून तिचे पूजन केले जाईल अशी अपेक्षा होती. मात्र याला पंचायत समितीच्या अधिकाऱ्यांनी तिलांजली दिली आहे. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अंकित हे आज रावेरमध्ये एका कार्यक्रमासाठी आले होते. मात्र त्यांनी पंचायत समितीकडे फिरकूनही पहिले नाही. नाहीतर हा प्रकार त्यांच्या लक्षात आला असता.
राष्ट्रपुरुषांचा अवमान
गेल्या पाच वर्षात येथील पंचायत समिती वैयक्तिक शौचालय घोटाळ्यामुळे संपूर्ण राज्यात गाजली होती. त्याच पंचायत समितीचा अंदाधुंद कारभार महापुरुषांच्या अवमानामुळे आज पुन्हा चव्हाट्यावर आला आहे. पंचायत समितीत रविवारी दुपारी जाऊन पाहणी केली असता स्वामी विवेकानंदांची मूर्ती जुन्या सभागृहात अडगळीच्या जागेत धुळीने माखलेल्या अवस्थेत दिसून आली. या राष्ट्रपुरुषांची जयंती सर्वत्र साजरी होत असताना येथील पंचायत समितीत मात्र त्यांच्या मूर्तीची अवहेलना व अवमान झाल्याचे पाहायला मिळाले.