निळे निशाण संघटनेच्या वर्धापन दिनानिमित्त मोफत रुग्णवाहिकेचे लोकार्पण

शौर्य दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात केले लोकार्पण

निळे निशाण संघटनेच्या वर्धापन दिनानिमित्त मोफत रुग्णवाहिकेचे लोकार्पण

प्रतिनिधी / रावेर 

    भिमा कोरेगांव शौर्य दिनानिमित्त व संघटनेच्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून निळे निशाण सामाजिक संघटनेतर्फे रुग्णांच्या सुविधेकरिता मोफत रुग्णवाहिका उपलब्चेध करून देण्यात आली आहे. या रुग्णवाहिकेचे लोकार्पण संघटनेचे संस्थापक अध्यक्ष आनंद बाविस्यांकर यांच्या  प्रमुख उपस्थितीत, जळगांव जिल्हा  सामान्य रुग्णालयाचे सिव्हिल हॉस्सपिटलचे वैद्र्जयकीय अधिकारी डॉ . आकाश चौधरी, रावेर तहसिलदार कार्यालायचे निवासी नायब तहसीलदार संजय तायडे, माऊली हॉस्पिटलचे संचालक स्त्रीरोग तज्ञ डॉ . संदीप पाटील, रावेर पोलीस स्टेशनचे पोलीस निरिक्षक डॉ विशाल जयस्वाल या मान्यवरांच्या हस्ते महापुरुषांच्या प्रतिमेचे पूजन करून रुग्णवाहिकेचे लोकार्पण करण्यात आले. त्याप्रसंगी संघटनेच्या मुंबई प्रदेश अध्यक्षा सुनैना पवार, जळगांव जिल्हा अध्यक्षा नंदा भावटे, जिल्हा कार्याध्यक्ष  ॲड . प्रविण इंगळे, जिल्हा उपाध्यक्ष सदाशिव निकम, फैजपुर विभाग अध्यक्षा लक्ष्मी मेढे, उपाध्यक्ष अनिल इंधाटे, इकबाल तडवी, विलास तायडे, अनिल तायडे, विजय धनगर, उज्वलाताई वाघ, निकिता भावटे, अनिता बाविस्कर, चंद्रकात सोनवणे यांच्यासह मान्यवर व निळे निशाण सामाजिक संघटनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित  होते .