ओंकारेश्वर मंदिरास ७५ लाखांचा निधी मंजूर : भाजपचे जिल्हाध्यक्ष अमोल जावळे यांचा पाठपुरावा

सभागृह बांधकाम व सुशोभीकरण होणार

ओंकारेश्वर मंदिरास ७५  लाखांचा निधी मंजूर : भाजपचे जिल्हाध्यक्ष अमोल जावळे यांचा पाठपुरावा

कृषीसेवक न्यूज नेटवर्क / रावेर 

रावेर तालुक्यातील नागरिकांचे असलेल्या श्री क्षेत्र ओंकारेश्वर येथील मंदिरास पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागाकडून ७५ लाखांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. याबाबतचा आदेश या विभागाने ११ मार्चला काढला आहे. 

ओंकारेश्वर येथील मंदिरात पायाभूत सुविधा पुरविण्यासाठी भारतीय जनता पक्षाचे जिल्हाध्यक्ष अमोल जावळे यांनी ग्रामविकास व पर्यटन मंत्री गिरीश महाजन यांच्याकडे या मंदिराच्या विकासासाठी निधीची मागणी केली होती. तसेच जावळे यांनी यासाठी पाठपुरावाही केला होता. त्यानुसार मंत्री गिरीश महाजन यांनी पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागातून या ठिकाणी सभामंडप बांधण्यासाठी ५० लाख व सुशोभीकरण करण्यासाठी २५ लाख असा एकूण ७५ लाखांचा निधी मंजूर केला आहे. हा निधी जळगावचे जिल्हाधिकारी यांना वितरित करण्यास शासनाने मान्यता दिली आहे. या निधीतून मंदिराचे सुशोभीकरण व भव्य सभागृहाचे बांधकाम होणार असल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे. तसेच ओंकारेश्वर देवस्थान मंदिर विश्वस्त मंडळाने ग्रामविकास व पर्यटन मंत्री गिरीश महाजन व जिल्ह्याध्यक्ष अमोल जावळे यांचे आभार मानले आहे.