रावेर पिपल्स बँकेच्या अध्यक्षपदी दिलीप पाटील तर उपाध्यक्षपदी राजेश शिंदे
विशेष सभेत निवड

रावेर/ प्रतिनिधी
येथील दि.रावेर पिपल्स को.ऑप.बँकेच्या अध्यक्षपदी दिलीप पाटील तर उपाध्यक्षपदी राजेश शिंदे यांची आज बिनविरोध निवड करण्यात आली.
रावेर पिपल्स को.ऑपरेटीव्ह.बँकेच्या अध्यक्ष व उपाध्यक्षपदाच्या निवडीसाठी संचालक मंडळाची विशेष सभा बँकेच्या सभागृहात आज झाली. निवडणूक निर्णय अधिकारी तथा सहाय्यक निबंधक जे.बी बारी यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली .त्यात अध्यक्षपदी दिलीप हिरामण पाटील तर उपाध्यक्षपदी राजेश सुधाकर शिंदे यांची बिनविरोध निवड झाली. यावेळी संचालक प्रल्हाद महाजन, राजेंद्र चौधरी , मानस कुलकर्णी, पंकज पाटील, सोपान साहेबराव पाटील, संजय वाणी, पुष्पाबाई महाजन, मीराबाई राऊत, अॅॅड प्रवीण पाचपोहे, विनोद तायडे यांच्यासह संचालक उपस्थित होते.निवड प्रकियेसाठी बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रकाश पाटील यांनी सहकार्य केले.
जळगाव जिल्ह्यात विस्तारासाठी प्रयत्न : दिलीप पाटील
निवडीनंतर अध्यक्ष व उपाध्यक्ष यांचा संचालक मंडळ व हितचिंतकांनी सत्कार केला. यात नवनिर्वाचित रावेर पिंपल्स बँकेचे अध्यक्ष दिलीप पाटील व उपाध्यक्ष राजेश शिंदे यांचा संचालक प्रल्हाद महाजन, भाजपचे ज्येष्ठ नेते सुरेश धनके, भाजप माजी तालुकाध्यक्ष राजन लासुरकर, सुनिल पाटील, भास्कर महाजन, उमेश महाजन, रवींद्र पाटील बंडू पाटील, रावेर शिक्षण संवर्धक संघाचे संचालक महेश अत्रे, अरुण शिंदे, नितीन पाटील, यांनी पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला.यावेळी बँकेचा जळगाव जिल्ह्यात विस्तार वाढवण्याचा प्रयत्न करण्यात येईल. तसेच सर्वांना विश्वासात घेवून पारदर्शी काम करण्यात येईल असे नवनिर्वाचित अध्यक्ष दिलीप पाटील यांनी सांगितले.