सेवाकाळात केलेल्या कामाची समाज दखल घेतो : माजी आमदार अरुण पाटील
दिलीप पाटील यांचा सेवा निवृत्तीनिमित्त सत्कार

रावेर/ प्रतिनिधी
शासकीय सेवा बाजावताना केलेल्या प्रामाणिक कामाची दखल समाज घेत असतो. अशा व्यक्तींचा समाजातर्फे होणारा गौरव इतरांना प्रेरणा देणारा आहे असे प्रतिपादन माजी आमदार अरुण पाटील यांनी केले. आभोडा (ता रावेर) येथील ग्रेडेड मुख्याध्यापक व कुसुंबा केंद्राचे प्र.केंद्रप्रमुख दिलीप पाटील ३८ वर्षांच्या प्रदीर्घ सेवेनंतर सेवानिवृत्त झाले.
त्यानिमित्ताने आयोजित सेवापूर्ती सोहळ्यात कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून श्री पाटील बोलत होते. कार्यक्रमाचे आयोजन येथील मराठा समाज मंगल कार्यालयात आयोजित या कार्यक्रमाचीसुरुवात मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून करण्यात आली. यावेळी व्यासपिठावर जि.प. माजीअध्यक्षा रंजना पाटील, मुख्याध्यापक महामंडळाचे माजी अध्यक्ष जे.के.पाटील, सुरेश धनके, पद्माकर महाजन, गट विकास अधिकारी के.पी.वानखेडे, गट शिक्षणाधिकारी विलास कोळी, राजेंद्र फेगडे, शाखा अभियंता अशोक गडाख, मराठा समाज विकास मंडळाचे अध्यक्ष राहूल पंडीत, दिलीप कांबळे उपस्थित होते.मान्यवरांच्या हस्ते दिलीप पाटील यांचा सेवापूर्ती निमित्ताने गौरव समीती व मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. यावेळी त्यांच्या कार्याची माहिती असलेल्या विशेषांकाचे प्रकाशन करण्यात आले. यावेळी मान्यवरांनी व कुटुंबियांनी मनोगत व्यक्त केले.
कार्यक्रमात प्रमुख पाहुणे पद्माकर महाजन,प्रकाश मुजुमदार,शैलेश राणे,किशोर पाटील, दिलीप का़ंबळे प्रविण पंडित, राहूल पाटील,हरीष गणवाणी, नितीन पाटील ,सी.एस.पाटील, सुरेश पाटील, जगदीश घेटे,बाळू शिरतुरे,पंकज पाटील, दुर्वास पाटील, ललित चौधरी, गणेश धांडे,अरूण पाटील,इ.मान्यवर व तालुक्यातील सर्व शिक्षक, मुख्याध्यापक, केंद्र प्रमुख,सरांचे सर्व नातेवाईक व मित्र परिवार उपस्थित होते.कार्यक्रमाचे प्रास्ताविक शैलेश राणे यांनी तर सुत्रसंचालन प्रा पंकज पाटील व निलिमा नेमाडे यांनी केले.आभार प्रदर्शन केंद्र प्रमुख गणेश धांडे यांनी मानले.