भोपाळला जागतिक गुंतवणूकदार शिखर परिषद : पद्मश्री स्व भवरलाल जैन यांच्या स्मृतीदिनी जैन इरिगेशनला शिखर परिषदेत सहभागाचा बहुमान
जैन इरिगेशनच्या कृषी उत्पादनांची उद्योजकांकडून पाहणी

भोपाळ/ विशेष प्रतिनिधी :
मध्य प्रदेशची राजधानी असलेल्या भोपाळ येथे दोन दिवसापासून जागतिक गुंतवणूकदार शिखर परिषद सुरु आहे. या परिषदेत भारतासह जगातील एकूण ६० देशातील आघाडीचे उद्योगपती आणि गुंतवणूकदार सहभागी झालेले आहेत. कृषी व सिंचन क्षेत्रात वैशिष्ट्यपूर्ण कार्य करणाऱ्या देशातील आघाडीच्या जळगाव येथील जैन इरिगेशन सिस्टम्स लिमिटेडलाही या परिषदेत सहभागी होण्याचा बहुमान प्राप्त झाला आहे. जैन इरिगेशनचे संस्थापक पद्मश्री स्व. भवरलाल जैन यांचा आज (दि २५ फेब्रुवारी ) स्मृतिदिन. याच दिवशी देशात होणाऱ्या जागतिक गुंतवणूकदार शिखर परिषदेत जैन इरिगेशनला सहभागी होण्याचा मिळालेला बहुमान हा स्व भवरलाल जैन यांच्या तपश्चर्येचे फळ आहे.
भोपाळमध्ये २४ व २५ फेब्रुवारी असे दोन दिवस जागतिक गुंतवणूकदार शिखर परिषद आयोजित करण्यात आली आहे. या परिषदेत जगभरातील आघाडीचे उद्योगपती सहभागी झाले आहेत. या परिषदेचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले असून यावेळी मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री डॉ मोहन यादव, यांच्यासह १३ राजदूत, अनेक राष्ट्रांचे उच्चायुक्त व मान्यवर उपस्थित आहेत. देशभरातील इतर आघाडीच्या कंपन्यांनीही या शिखर परिषदेत भाग घेतला आणि त्यांच्या नवीनतम तंत्रज्ञानाचे आणि सेवांचे प्रदर्शन केले.
जैन इरिगेशनचा स्टॉल विशेष आकर्षण
या शिखर परिषदेच्या निमित्ताने अनेक उद्योजक कंपन्यांनी निर्मित उत्पादनांचे स्टोल उभारले आहेत. यात जैन इरिगेशनचा स्टोल विशेष आकर्षण ठरला. या ठिकाणी जैन इरिगेशनतर्फे आधुनिक सिंचन (सूक्ष्म सिंचन) प्रणालीचे मॉडेल उभारण्यात आले आहे. तंत्रज्ञान आणि नवीनतम उत्पादने प्रदर्शित करण्यात आली. शेतकऱ्यांना ठिबक सिंचन, तुषार सिंचन, ऑटोमेशन तंत्र आणि रोपवाटिका यासारख्या प्रगत (जैन टिश्यू कल्चर) कृषी तंत्रांचे प्रात्यक्षिक दाखवण्यात आले.
शेतकऱ्यांसाठी नवीन तंत्रज्ञान आणि उपाय
लहान शेतकऱ्यांपासून ते मोठ्या उद्योगासाठी लागणाऱ्या पीव्हीसी पाईप्सपासून ते एचडीपीई, डीडब्ल्यूसी सारख्या मोठ्या औद्योगिक पाईप्सपर्यंत कृषी संसाधने येथे उपलब्ध आहेत. शेतकऱ्यांना त्यांच्या गरजेनुसार जैन इरिगेशनकडून हि उत्पादने पुरवली जातात. कंपनीच्या अत्याधुनिक सिंचन प्रणाली केवळ पाण्याचे संवर्धन करण्यास मदत करत नाहीत तर शेतकऱ्यांना उच्च उत्पादकता आणि चांगले पीक उत्पादन मिळविण्यास देखील मदत करतात.
बँक आणि उद्योग अधिकाऱ्यांशी चर्चा
या कार्यक्रमात जैन इरिगेशनच्या प्रतिनिधींनी विविध औद्योगिक अधिकारी आणि बँक अधिकाऱ्यांशी चर्चा केली. यामध्ये शेतकऱ्यांना आधुनिक सिंचन तंत्रांसाठी कर्ज सुविधा देण्याबाबतही चर्चा झाली. बँकेच्या अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांना या तंत्रज्ञानाशी जोडण्यासाठी आणि त्यांना आर्थिक मदत देण्यासाठी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले आहे.
शेतकऱ्यांच्या उज्ज्वल भविष्याकडे एक पाऊल
जैन इरिगेशनचा हा प्रयत्न भारतीय शेतीचे आधुनिकीकरण आणि जलसंवर्धनाला चालना देण्याच्या दिशेने एक महत्त्वाचे पाऊल आहे. या शिखर परिषदेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना नवीन तंत्रज्ञानाची माहिती मिळाली आणि त्यांची शेती अधिक फायदेशीर बनवण्यासाठी प्रगत उपकरणांची माहिती घेण्याची संधी मिळाली. जैन इरिगेशनच्या वतीने माइक्रो इरिगेशन स्टेटहेड विवेक डांगरीकर, मध्यप्रदेश कॉर्डिनेटर मधुर भंडारी, एरिया मैनेजर पंकज जयस्वाल, इंजीनियरिंग जावेद खान, कृषि विशेषज्ञ अझहर झैदी यांनी या शिखर परिषदेत माहिती दिली. जागतिक गुंतवणूकदार शिखर परिषदेत जैन इरिगेशनचा सहभाग स्पष्टपणे दर्शवितो की कंपनी कृषी आणि सिंचन क्षेत्रात तांत्रिक नवोपक्रम आणि शाश्वत विकासासाठी वचनबद्ध आहे.