गोदावरी मल्टीस्टेट सोसायटीने रावेर तालुक्याच्या आर्थिक विकासाला बळ द्यावे : माजी आमदार अरुण पाटील
गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर रावेर येथे शाखेचा शुभारंभ
प्रतिनिधी/रावेर
समाजाच्या आर्थिक प्रगतीत स्थानिक पातळीवरील सहकारी बँका व सोसायट्यांचा मोठा वाटा आहे. उद्योग क्षेत्रात येणाऱ्यांना कर्जपुरवठा करून उद्योगांना चालना देण्याचे काम या संस्था करीत असतात. त्यामुळे काही अंशी बेरोजगारीचा प्रश्न सुटण्यास मदत होते. गोदावरी मल्टीस्टेट को-ऑप क्रेडीट सोसायटीने रावेर तालुक्याच्या आर्थिक विकासाला बळ द्यावे असे आवाहन माजी आमदार अरुण पाटील यांनी केले. या संस्थेच्या रावेर येथील शाखेचा शुभारंभप्रसंगी आयोजित कार्यक्रमात अध्यक्षस्थानावरून मार्गदर्शन करतांना ते बोलत होते.
छत्रपती संभाजीनगर येथील गोदावरी मल्टीस्टेट को-ऑप क्रेडीट सोसायटीच्या रावेर शाखेचा आज गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर शुभारंभ करण्यात आला. तहसील कार्यालयाजवळील कॉम्प्लेक्समध्ये असलेल्या या शाखेचे फीत कापून मान्यवरांनी उद्घाटन केले. यावेळी व्यासपीठावर जळगाव जनता सहकारी बँकेचे अध्यक्ष सतीश मदाने, चोपडा पिपल्स बँकेचे चेअरमन चंद्र्हंस गुजराथी, नगराध्यक्ष संगीता महाजन, मुरलीधर महाजन, बऱ्हाणपूर येथील ठाकूर नवलसिंग सहकारी साखर कारखान्याचे संचालक मुरलीधर महाजन, राष्ट्रवादी कॉंग्रेस (अजित पवार गट) प्रदेश प्रवक्त्या प्रतिभा शिंदे, जिल्हा बँकेचे माजी उपाध्यक्ष राजीव पाटील, माजी नगराध्यक्ष दारा मोहम्मद, हरीश गनवाणी, शितल पाटील, रमेश महाजन, रावेर पिपल्स बँकेचे माजी अध्यक्ष प्रल्हाद महाजन, स्वामी एज्युकेशन ग्रुपचे अध्यक्ष रवींद्र पवार, सूर्यवंशी क्षत्रिय मराठा समाज अध्यक्ष गंगाराम दानी, अंबिका व्यायाम शाळेचे अध्यक्ष भास्कर महाजन, कामगार नेते दिलीप कांबळे, छाया महाजन यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.
मार्गदर्शन करतांना माजी आमदार श्री पाटील पुढे म्हणाले की, राजकारणाचा केंद्रबिंदू शेतीमातीशी जोडलेला आहे. शेती आणि सहकार या क्षेत्रातूनच कार्यकर्ते घडत असतात. सहकारी संस्थामुळे समाजाच्या प्रगतीला खऱ्या अर्थाने पाठबळ मिळते. गोदावरी मल्टीस्टेट सोसायटीने रावेर तालुक्याच्या विकासासाठी पुढाकार घ्यावा असे आवाहन यावेळी त्यांनी केले. यावेळी प्रतिभा शिंदे, राजीव पाटील, चंद्र्हंस गुजराथी, प्रल्हाद महाजन यांनी यावेळी मनोगत व्यक्त केले. संस्थेचे संस्थापक चेअरमन प्रभाकर पराड पाटील यांनी प्रास्ताविकातून संस्थेच्या वाटचालीचा आढावा सादर केला. आलेल्या मान्यवरांचे स्वागत संस्थेचे चेअरमन प्रभाकर पराड पाटील, रावेरचे माजी नगराध्यक्ष व संस्थेचे संचालक ज्ञानेश्वर महाजन व सहकाऱ्यांनी केले. सुत्रसंचलन भूषण चौधरी यांनी तर आभार ज्ञानेश्वर महाजन यांनी मानले.

krushisewak 
