प्रतिनिधी /रावेर
आदिवासी तडवी भिल्ल एकता मंचतर्फे येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. यावेळी शहरातून जाणारा बऱ्हाणपूर-अंकलेश्वर महामार्ग आंदोलकांनी तब्बल एक रोखून धरला.
रावेर तालुक्यातील वन विभागात परप्रांतीय मेढपाळ यांना बंदी करण्याबाबत रास्ता रोको आंदोलन तडवी भिल्ल एकता मंचकडून करण्यात आले. आंदोलनस्थळी रावेर वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांनी भेट देवून आंदोलकांशी चर्चा केली. तसेच वनक्षेत्रात कोणत्याही प्रकारचे परप्रांतीय मेढपाळ व कोणतीही अवैध चराई आढळून आल्यास त्यावर तात्काळ वन कायदयानुसार कारवाई करण्याचे आश्वासन दिले. त्यानंतर आंदोलन तब्बल एक तासांनी मागे घेण्यात आले. आंदोलनात सहभागी आदिवासी तडवी भिल्ल एकता मंचचे राज्य सदस्य नशिर तडवी, जिल्हाध्यक्ष सलीम तडवी, कार्याध्यक्ष फिरोज तडवी, उपाध्यक्ष सर्फराज तडवी, जिल्हा सचिव जहाँगीर तडवी, तालुकाध्यक्ष सलीम तडवी, जुम्मा तडवी, जाहबीर तडवी, रमा तडवी, लुकमान तडवी, चांदखा तडवी ,महिला जिल्हाध्यक्ष हसीना तडवी, उपाध्यक्ष, मुन्नाबाई तडवी, सचिव बबिता तडवी, समिना तडवी, जुगरा तडवी, सुगराबाई तडवी, हसनूर तडवी रेहाना तडवी, जुबेदा तडवी, हजरबाई तडवी, उमर तडवी, रफिक तडवी व मोठ्या संख्येने आदिवासी समाज उपस्थित होते.