रावेरला संत संताजी जगनाडे महाराजांना अभिवादन : ४०० वी जयंती विविध ठिकाणी उत्साहात साजरी

तेली समाज पंच भवनात पूजन

रावेरला संत संताजी जगनाडे महाराजांना अभिवादन : ४०० वी जयंती विविध ठिकाणी उत्साहात साजरी

रावेर (प्रतिनिधी)- संत श्री संताजी जगनाडे महाराज यांच्या ४०० व्या जयंती दिना निमित्त रावेर येथील तेली समाजातर्फे तसेच विविध ठिकाणी आभिवादन कार्यक्रम संपन्न झाले.  

   येथील तेली समाज पंच भुवन येथे जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात समाजाचे अध्यक्ष सुभाष चौधरी यांच्या हस्ते मुर्तीचे पुजन करण्यात आले. यावेळी उपाध्यक्ष हिरामण चौधरी, कार्याध्यक्ष अनिल चौधरी, सचिव संजय चौधरी, सहसचिव चंद्रकांत चौधरी, अॅड सुरज चौधरी, भगवान चौधरी, अशोक चौधरी, सुनील चौधरी, संतोष चौधरी, भुषण महाजन, अॅड भगवान चौधरी, अॅड रविंद्र चौधरी, प्रल्हाद चौधरी, सुरेश चौधरी, विनोद चौधरी, अनिल चौधरी, पांडुरंग चौधरी, पंकज चौधरी, अमोल कासार, जगदिश चौधरी, सुमित चौधरी, चेतन चौधरी, वैभव चौधरी, प्रकाश चौधरी, यांचे सह समाज बांधव, युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.    

येथिल स्टेशन रोड वरील संत संताजी जगनाडे महाराज चौकातही नामफलकाचे पुजन करून पुष्पहार उपस्थित समाज बांधवांनी अर्पण केला. यासह रावेर नगर पालिका, एस टी महामंडळ आगार येथे व विविध शासकिय कार्यालयातही संत संताजी जगनाडे महाराज यांच्या जयंती निमित्ताने प्रतिमा पुजन करून पुष्पहार अर्पण करण्यात आले.