उल्लेखनीय कामगिरी : शताब्दी वर्षाकडे वाटचाल करणाऱ्या रावेर पीपल्स बँकेला प्रथमच 1 कोटी 17 लाखांचा विक्रमी नफा
सभासदांचा विश्वास हीच पावती : अध्यक्ष दिलीप पाटील
प्रतिनिधी / रावेर
शताब्दी वर्षाकडे वाटचाल करणाऱ्या येथील दि रावेर पिपल्स को आपरेटिव्ह बँकेने प्रगती साधत आर्थिक वर्ष 2025-26 मध्ये ढोबळ नफा 1 कोटी 17 लाख रुपये विक्रमी नफा मिळवला आहे. बँकेच्या स्थापनेनंतर गेल्या 93 वर्षातील नफ्याचे सर्व विक्रम मोडीत काढत उत्कृष्ट कामगिरी केल्याने हा नफा मिळाला आहे.
बँकेच्या सभासदांना स्थानिक पातळीवर तात्काळ कर्ज उपलब्ध करून देण्यासाठी बँकेचा नेहमी प्रयत्न राहिला आहे. पारदर्शक व्यवहार, योग्य व्यवस्थापन, व नियोजनबद्ध कामकाज कर्मचाऱ्यांचे परिश्रम यामुळे सभासदाचा बँकेवर दृढ विश्वास आहे. संचालक मंडळाचा विकासात्मक दृष्टिकोन व सभासदांना दिल्या जाणाऱ्या तात्काळ सेवेवर असलेला भर यामुळे बँकेच्या नावलौकिक प्राप्त झाला आहे. सर्व ग्राहक सभासद, हितचिंतक व कर्मचारी वर्ग यांच्या एकत्रित सहकार्यामुळे बँकेला हे यशगाठता आले आहे.यापुढेही डिजिटल ट्रान्सफॉर्मेशनवर भर, जोखीम व्यवस्थापन अधिक मजबूत करणे, ग्राहक समाधान व सेवा गुणवत्ता उंचावणे, ग्राहकाभिमुख सेवा सुधारणा व डिजिटल बँकिंग सुविधांचा विस्तार,ग्रामीण व शहरी भागात आर्थिक समावेशनासाठी विशेष मोहीम,महिला व युवक उद्योजकांसाठी विशेष कर्ज योजना याबाबी भविष्यात राबविण्यासाठी बँकेचे अध्यक्ष दिलीप पाटील, उपाध्यक्ष राजेश शिंदे, संचालक प्रल्हाद महाजन, सोपान बाबुराव पाटील, सोपान साहेबराव पाटील, मानस कुलकर्णी, संजय वाणी, राजेंद्र चौधरी, पंकज पाटील, एड प्रवीण पासपोहे, पुष्पाबाई महाजन, मीराबाई राऊत, विनोद तायडे, सुनील पाटील, दीपिका अग्रवाल व बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रकाश पाटील प्रयत्नशील आहेत.
*2025-26 या संपलेल्या आर्थिक वर्षात बँकेची आर्थिक स्थिती पुढीलप्रमाणे :
* एकूण ठेवी (Deposits): ₹48.22 कोटी (वाढ: 1.39 कोटी )
* एकूण कर्जवाटप (Advances): ₹ 30.03कोटी (वाढ: 4.46 कोटी)
* नफा (Net Profit): ₹[रक्कम] 60. 83 लाख,
* ढोबळ नफा (Gross Profit): ₹ 1.17 कोटी
* नेट एनपीए (NPA): 0%
* सीडी रेशो (CD Ratio): 62.27%
“बँकेच्या आर्थिक प्रगतिमागे व या यशामागे आमच्या सभासद ग्राहकांचा विश्वास, पारदर्शी व्यवहार, संचालक मंडळाचे मार्गदर्शन आणि कर्मचाऱ्यांचे समर्पित प्रयत्न कारणीभूत आहेत. आगामी काळातही बँक अधिक नाविन्यपूर्ण सेवा देत आर्थिकदृष्ट्या सक्षम संस्था म्हणून पुढे वाटचाल करेल. ग्राहकांना सुरक्षित, विश्वासार्ह व आधुनिक बँकिंग सेवा देण्यास कटिबद्ध आहे."
---- दिलीप हिरामण पाटील, अध्यक्ष, पीपल्स बँक, रावेर

krushisewak 
