केळी तंत्रपुष्प : मृदगंध फौंडेशनतर्फे ७ जूनला रावेरला केळी बागायतदार परिषदेचे आयोजन
तज्ञ सांगणार निर्यातक्षम व गुणवत्तापूर्ण केळीच्या उत्पादनाचा मंत्र
प्रतिनिधी/रावेर
खान्देशातील केळी उत्पादक शेतकऱ्यांना “उच्च गुणवत्तापूर्ण व निर्यातक्षम केळीचे उत्पादन” या विषयासह केळीचे तंत्रशुद्ध पद्धतीने व्यवस्थापन या विषयावर मृदगंध फौंडेशनतर्फे केळी तंत्रपुष्प-२०२६ अंतर्गत खान्देश विभाग केळी बागायतदार परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे.
रावेर येथील अग्रसेन भवनमध्ये आयोजित केलेल्या या कार्यक्रमाचे अग्री सर्च(इंडिया) प्रा लि. व मृगधारा अग्रो(इंडिया) प्रा लि. या उद्योग समूह प्रायोजक आहेत. ७ जूनला सकाळी सकाळी साडे नऊ वाजता या परिषदेला सुरुवात होईल. यावेळी तांत्रिक सत्रात केळी विषय विशेतज्ञ शरद विसपुते कार्यक्रमाचा उद्देश प्रस्तावनेतून सांगतील. उच्च गुणवत्तेच्या केळी उत्पादनासाठी जमिनीचे आरोग्य व ओरीजीनोचा प्रभावी वापर या विषयावर मृदा शास्त्रज्ञ डॉ. ओमप्रकाश हिरे, केळी पिकामध्ये जैविक उत्पादनाचे महत्व व उत्पादन वाढीसाठी योग्य वापर तंत्र या विषयवार अग्री सर्च उद्योगाचे व्यवस्थापकीय संचालक प्रदीप कोठावदे उपस्थित केळी बागायदार शेतकऱ्यांना मार्गदर्शन करणार आहेत. जैविक-अजैविक ताण, सुत्रकृमी व बनाना रूट विव्हीलचे एकात्मिक व्यवस्थापन या विषयवर उद्यानविद्या शास्त्रज्ञ डॉ गौरव घोरमाडे मार्गदर्शन करणार आहेत. यावेळी उपस्थित केळी उत्पादक शेतकऱ्यांच्या समस्या, शंका व प्रश्नांना उपस्थित तज्ञ उत्तरे देणार असून त्यावर सखोल मार्गदशन करतील. केळी तज्ञ विजय पाटील आभाराने कार्यक्रमाची सांगता करतील.

krushisewak 
