BREKINg : रावेर तालुक्यात जिबीएस सदृश्य लक्षणें असलेला रुग्ण आढळल्याने खळबळ
आरोग्य यंत्रणा सतर्क

प्रतिनिधी / रावेर
रावेर तालुक्यातील एका गावात 22 वर्षीय तरुणांमध्ये जिबीएस सदृश्य लक्षणे आढळून आल्याने तालुक्यात खळबळ उडाली आहे. बऱ्हाणपूर येथील एका खासगी रुग्णालयात उपचार घेतल्यावर तेथील डॉक्टरांनी पुढील उपचार न्युरोलिजिस्टकडे घेण्याचा सल्ला रुग्णच्या नातेवाईकांना दिला आहे. या घटनेने तालुक्यात खळबळ उडाली असून आरोग्य यंत्रणा सतर्क झाली आहे.
हा युवक कुंभमेळ्यासाठी प्रयागराज येथे गेला होता. मात्र तेथून परत आल्यावर तब्बेत ठीक नसल्याने त्याने बऱ्हाणपूर येथील एका खासगी रुग्णालयात उपचार घेतले. उपचार करणाऱ्या डॉक्टरांनी जिबीएस सदृश्य लक्षणे असल्याचे सांगितले. व पुढील उपचार न्युरोलॉजिस्ट किंवा मुंबई येथे घेण्याचा सल्ला दिला आहे. याची माहिती प्रशासनाला समजल्यावर आरोग्य यंत्रणा सतर्क झाली आहे.
जिल्हास्तरावरून हालचाली सुरु
रावेर तालुक्यातील एका 22 वर्षीय युवकात जिबीएस सदृश्य लक्षणे असल्याची माहिती जिल्हास्तरावरील प्रशासन व आरोग्य विभागाला समजताच हालचाली वेगाने सुरु झाल्या आहेत. आरोग्य विभागाचे एक पथक संबंधित गावाच्या दिशेने रवाना झाल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे.