श्रेयवादाचा प्रश्नच नाही, बस मिळण्यासाठी दोघांच्या पाठपुराव्याला यश ; आमदार नंदकिशोर महाजन
रावेर आगारात आमदार महाजन यांच्या हस्ते ५ बसचे लोकार्पण
प्रतिनिधी/रावेर
रावेर आगाराला बस मिळण्यासाठी आमदार अमोल जावळे यांच्यासह मी प्रयत्न व पाठपुरावा केला आहे. आम्ही दोघे भाजपचे आमदार असून आमचा पक्ष सत्तेत आहे. रावेर तालुक्याचा सर्वांगीण विकास हाच आमचा दोघांचा अजेंडा आहे. त्यामुळे बस मिळवण्यामागे कोणताही श्रेयवादाचा प्रश्न नसल्याचा निर्वाळा विधान परिषदेचे आमदार नंदकिशोर महाजन यांनी दिला. रावेर आगारात राजमाता जिजाऊ योजनेंतर्गत मिळालेल्या ५ बसच्या लोकार्पण सोहळ्यात ते बोलत होते.
रावेर आगाराला १० बस मिळविण्यासाठी यापूर्वी आमदार अमोल जावळे यांनी शासनाकडे प्रयत्न व पाठपुरावा केलेला होता. मात्र त्यावेळी ५ बस मिळाल्या होत्या. रावेर आगारातील बसची कमतरता व प्रवाशांची मागणी लक्षात घेवून आमदार जावळे व यांचा पाठपुरावा सुरु होता. २६ जुलैला आमदार नंदकिशोर महाजन यांनी एसटी महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालकांना पत्र देवून ५ बसची मागणी केली होती. त्यानुसार रावेर आगाराला राजमाता जिजाऊ योजनेतून ५ नवीन बस प्राप्त झाल्या आहेत. या बसचा लोकार्पण सोहळा आमदार नंदकिशोर महाजन यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी भाजपचे जेष्ठ नेते सुरेश धनके, नगराध्यक्ष संगीता महाजन, बाजार समितीचे सभापती प्रल्हाद पाटील, माजी नगराध्यक्ष पद्माकर महाजन, नगरसेवक राजेश शिंदे, राजेंद्र चौधरी, अरुण अस्वार, भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष अरुण शिंदे, लोकसभा क्षेत्र संयोजक सुनील पाटील, विजय महाजन, संजय महाजन, वासुदेव नरवाडे, संजय गुलाब पाटील(केऱ्हाळा), उमेश महाजन, नितीन पाटील, शैलेंद्र अग्रवाल, बाळा अमोदकर यांच्यासह मोठ्या प्रमाणावर भाजपचे पदाधिकारी व नागरिक उपस्थित होते. आगार किशोर मगरे यांनी उपस्थित मान्यवरांचे शाल व पुष्पगुच्छ देवून स्वागत केले.
रावेर तालुका ही माझी कर्मभूमी असून रावेरचे दोन्ही आमदार भाजपचे आहेत. रावेर मतदार संघाच्या विकासासाठी आमचा दोघांचा प्रयत्न राहणार आहे. श्रेयवादाचा प्रश्न नसून कार्यकर्त्यांनी आपण भाजपचे कार्यकर्ते आहोत हे लक्षात ठेवावे. आमदार अमोल जावळे यांच्याशी माझे रात्री लोकार्पण सोहळ्याला उपस्थित राहण्याबाबत बोलणे झाले होते. मात्र ते मुंबईत असल्याने येवू शकले नाही अशी माहिती यावेळी आमदार नंदकिशोर महाजन यांनी दिली. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन पत्रकार दीपक नगरे यांनी केले, आभार अगर प्रमुख किशोर मगरे यांनी मानले.
शेगाव बस सुरु करण्याच्या सूचना
रावेर आगारातून पूर्वी शेगाव बस सुरु होती. मात्र ही बस अनेक वर्षापासून बंद करण्यात आल्याने शेगावला जाणाऱ्या भाविकांना अडचणींचा सामना करावा लागतो. त्यामुळे रावेर आगारातून पुन्हा दर गुरुवारी शेगाव बस सुरु करावी अशी मागणी यावेळी काही प्रवाशांनी आमदार नंदकिशोर महाजन यांच्याकडे केली. प्रवाशांची मागणी लक्षात घेवून ही बस तात्काळ सुरु करण्याच्या आमदार महाजन यांनी आगार प्रमुखांना सूचना दिल्या आहेत.

krushisewak 
