बाजार समितीचे संचालक पांडुरंग पाटील यांचा राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) गटात प्रवेश

अजित पवार गटाला दिली सोडचिट्टी

बाजार समितीचे संचालक पांडुरंग पाटील यांचा राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) गटात प्रवेश

प्रतिनिधी/ रावेर

येथील बाजार समितीचे संचालक व राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे पांडुरंग पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटात आज तालुकाध्यक्ष किशोर पाटील, किसान सेलचे जिल्हाध्यक्ष सोपान पाटील, माजी नगराध्यक्ष गोटूशेठ महाजन, सरचिटणीस लक्ष्मण मोपारी यांच्या उपस्थितीत त्यांनी प्रवेश घेतला. 

येथील कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती सचिन पाटील व उप सभापती योगेश पाटील यांच्यावर अविश्वास प्रस्ताव मंजूर झाला होता. त्यावेळी संचालक पांडुरंग पाटील अविश्वास प्रस्तावाच्या बाजूने व सभापती व उप सभापतीच्या विरोधात होते.

दरम्यान, सोमवारी सभापती व उप सभापती पदासाठी निवडणूक होत आहे. सभापतीपदी प्रल्हाद पाटील तर उप सभापतीपदी पांडुरंग पाटील यांची वर्णी लागण्याची अधिक शक्यता आहे. तत्पूर्वी पांडुरंग पाटील यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाला सोडचिट्टी देत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटात प्रवेश घेतला आहे.