रावेरच्या श्री सिद्धिविनायक प्रिंटर्स अँड पब्लिकेशन्सच्या दोन पुस्तकांचे रविवारी प्रकाशन
रोझोद्यात हास्यसम्राट कवी अशोक नायगावकर यांची प्रमुख उपस्थिती
प्रतिनिधी/रावेर
रावेर येथील जेष्ठ पत्रकार कृष्णा पाटील संचलित श्री सिद्धिविनायक प्रिंटर्स अँड पब्लिकेशन्स या संस्थेतर्फे प्रकाशित होणाऱ्या “दिवा तुळशीरामाचा” व “ज्ञानधारा” या दोन पुस्तकांचा प्रकाशन सोहळा येत्या रविवारी संपन्न होत आहे. रोझोदा(ता. रावेर) येथील रहिवासी असलेले लेखक राजेंद्र चौधरी यांनी या दोन्ही पुस्तकांचे लेखन केलेले आहे. हा सोहळा रोझोदा येथील जागृत तीर्थक्षेत्र श्री कामसिध्द मंदिर सभामंडपात रविवारी(दि. २६) सकाळी १० वाजता आयोजित करण्यात आला आहे. पुस्तक प्रकाशन सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी हास्यसम्राट कवी अशोक नायगांवकर उपस्थित राहणार आहेत.
श्री सिद्धिविनायक प्रिंटर्स अँड पब्लिकेशन्स या संस्थेद्वारे प्रकाशित होणारे तिसरे पुस्तक आहे. यापूर्वी “अमृतवेल” हा काव्यसंग्रह मुंबई येथे प्रकाशित करण्यात आला होता. राजेंद्र चौधरी लिखित 'दिवा तुळशीरामाचा' कविता संग्रह व 'ज्ञानधारा' लेखसंग्रहाचे यावेळी प्रकाशन करण्यात येणार आहे. पुस्तकाचे प्रकाशन अखिल भारतीय संत समितीचे कोषाध्यक्ष महामंडलेश्वर प. पू. जनार्दन हरिजी महाराज व मुंबई येथील प्रियदर्शनी शैक्षणिक व सामाजिक विकास मंडळाचे अध्यक्ष व प्राचार्य डॉ. आशीर्वाद लोखंडे यांच्या हस्ते होणार आहे. यावेळी प्रमुख पाहूणे म्हणून सावदा येथील ज्येष्ठ लेखक व्याख्याते प्रा. व. पु. होले, ज्येष्ठ कवी डॉ. अतुल सरोदे, भारत २४ तास न्यूजचे संपादक संदीप कसाळकर, रोझोदा येथील लोकशिक्षण मंडळाचे उपाध्यक्ष रमेश महाजन, श्रीराम मंदिर व कामसिध्द मंदिर विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष विजय महाजन, श्री सिद्धिविनायक प्रिंटर्स अँड पब्लिकेशन्सचे संचालक तथा प्रकाशक व साप्ताहिक कृषिसेवकचे संपादक कृष्णा पाटील उपस्थित राहणार आहेत. तसेच श्रीराम मंदिर व कामसिध्द मंदिर विश्वस्त मंडळाच्या वतीने जागृत तीर्थक्षेत्र श्री कामसिध्द महाराजांच्या “आख्यायिका पुस्तिकेचे” प्रकाशन करण्यात येणार आहे.
कवी संमेलनाचे आयोजन
यावेळी कवी संमेलनाचे आयोजन करण्यात आले असून डाँ. अतुल सरोदे(सावदा), राजेंद्र चौधरी(रोझोदा), रजनी निकाळजे(मिरारोड), स्वाती शृंगारपूरे(बोरीवली), आर. बी. सोनवणे(जळगाव), विजय लुल्हे(जळगाव), संतोष मोहिते(मुंबई), पी. के पाटील (रावेर) यांचा यात सहभाग असणार आहे.

krushisewak 
