युवा नेते धनंजय चौधरींच्या संकल्पनेतून कृतज्ञता संवाद यात्रेला सुरुवात : गौरखेड्यात गावविहिरीचे जलपूजन

नागरिकांशी साधला जाणार संवाद

युवा नेते धनंजय चौधरींच्या संकल्पनेतून कृतज्ञता संवाद यात्रेला सुरुवात : गौरखेड्यात गावविहिरीचे जलपूजन

प्रतिनिधी/ रावेर 

एनएसयुआयचे राज्य सरचिटणीस व युवा नेतृत्व धनंजय चौधरी यांच्या संकल्पनेतून रावेर-यावल तालुक्यातील जनतेशी संवाद साधण्यासाठी व त्यांच्याप्रती असलेली कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी कृतज्ञता संवाद यात्रेचा उपक्रम राबवला जात आहे. यात्रेची सुरुवात आजपासून (दि 2) सातपुडयाच्या पायथ्याशी असलेल्या गौरखेडा गावापासून झाली. 

ही यात्रा गौरखेडा,लोहारा,चिंचाटी,जानोरी अशी भेट देत पुढे प्रस्थान करत आहे. सातपुडा परिसरातील आदिवासी व शैक्षणिक दृष्ट्या मागासलेला भाग स्वर्गीय धनाजी नाना चौधरी यांनी गौरखेडा या गावापासून रचनात्मक कार्याला सुरुवात केली. सर्वप्रथम त्यांनी गौरखेडा पंचक्रोशी मंडळ स्थापन केले व त्या मार्फत सूत कताई शिकवले त्याचप्रमाणे इथे स्थानिक रहिवाशी यांच्या राहण्याची व्यवस्था करून वसाहत निर्माण केली तिथल्या समस्या समजून घेत संपूर्ण सातपुडा पायथ्याचा विकास करण्याचे ठरवले व त्यातूनच सातपुडा विकास मंडळाची स्थापना झाली. बाळासाहेब मधुकरराव चौधरी यांनी 1988 या वर्षी गौरखेडा येथे आश्रम शाळा सुरू केली. गावकऱ्यांनी त्यासाठी तीन एकर जमीन दान केली त्यामुळे तिथल्या लोकांची शिक्षणाची सोय झाली. त्यातून शिक्षक निर्माण झाले हळूहळू गावाचा विकास झाला. दादासाहेबांनी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करून दिली अशा या जुन्या परंपरेला कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी युवा नेते धनंजय चौधरी यांच्या यात्रेदरम्यान गावाच्या विहिरीचे जलपूजन सुमित्रा विनोद भालेराव यांच्या हस्ते करण्यात आले.यावेळीधनंजय चौधरी यांनी गावकऱ्यांना पाण्याचे महत्व समजून सांगून जुन्या वाडवडिलांचा वारसा जोपासण्यासाठी त्यांच्यामध्ये जागृती निर्माण केली. आदिवासी मुलांना शिक्षण पोहोचले तरी पण त्या गावातील ज्या समस्या होत्या त्या गावकऱ्यांनी मांडल्या. शाळेसाठी कॉम्प्युटर प्रिंटर, वाचनालय, पाण्याची टाकी इत्यादी मागण्या गावकऱ्यांनी यावेळी मांडल्या. त्याचप्रमाणे महिला बचत गटाच्या समस्या व गावासाठी दोन किलोमीटरचा रस्ता मंजूर झालेला आहे व पुढील सुधारणा करण्याचे आश्वासन दिले. यावेळी मन्सूर तडवी,गंभीर तडवी,महिला बचत गट- सरपंच सुलताना यासीन तडवी, यासीन तडवी, युसुफ रमजान तडवी(अध्यक्ष वनसमिती),उस्मान तडवी, रज्जाक तडवी, सलीम तडवी, गंभीर तडवी तसेच धनंजय चौधरीनी स्वयम् रोजगार निर्माण करण्यासाठी नवनवीन योजना सुचवल्या. तसेच गावतील अडचणी सोडवण्यासाठी मार्गदर्शन केले.जानोरी येथे गावविहिर पूजन सरपंच सुलताना यासीन तडवी आणि उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आली. चिंचाटी गावात पंप पूजन रशीद तडवी, छोटू तडवी सरपंच यांच्या हस्ते करण्यात आली.यावेळी गावातील स्वर्गीय व लोकांच्या स्मरणार्थ वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी रेहमान तडवी, युसुफ तडवी, मन्सूर तडवी, गंभीर तडवी, हाबिब तडवी, मुबारक तडवी, असलम तडवी ग्राम पंचायत सदस्य उपस्थित होते. वृक्षारोपण हबीब तडवी, सिकंदर तडवी, रशीद तडवी, मयूर नारखेडे, रेहमान तडवी ह्यांच्या हस्ते करण्यात आले.

3 रोजी या गावात कृतज्ञता संवाद यात्रा : सहस्त्रलिंग ,लालमाती ,कुसुंबे बुद्रुक, कुसुंबे खु