रावेरला मोटार सायकल चोरी प्रकरणी एकास अटक : दोन मोटार सायकल जप्त
गुन्हे प्रकटीकरण शाखेचा तपास
प्रतिनिधी/ रावेर
रावेर पोलीस स्टेशन हद्दीतून चोरीस गेलेल्या मोटार सायकलचा शोध घेत असताना सायला मानसिंग बारेला रा.खा-या काकोडा ता झिरण्या जि खरगोन मध्य प्रदेश , ह.मु. गिटटी खदान उटखेडा रोड, रावेर याने मोटार सायकल चोरून आणल्याची माहिती रावेर पोलिसांना गुप्त माहिती मिळाली. आरोपीची चौकशी केली असता त्याने मोटार सायकल चोरीची कबुली दिल्याने त्याला अटक करण्यात आली आहे.
८ मार्चला येथील पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेतर्फे चोरीस गेलेल्या हीरो स्प्लेंडर क्रमांक एमएच १९ ईडी ५२७५ चा शोध घेत असताना ही मोटार सायकल सदर आरोपीच्या ताब्यात असल्याची माहिती मिळाली. आरोपीला थांबवून चौकशी केली व मोटार सायकलची कागदपत्र मागितले असता त्याने कागदपत्र सादर न करता उडवाउडवीची उत्तरे पोलीसांना दिली. त्याने त्याच्या ताब्यातील हिरो सप्लेंडर कंपनीची काळया रंगाची वरील क्रमांकाची मोटार सायकल रावेर येथील आठवडे बाजार पटयातील नगर पालिकेच्या सार्वजनिक शौचालयाच्या गल्लीतून चोरल्याची कबुली दिली आहे. तसेच बजाज कंपनीची सीटी १०० काळया रंगाची मोटार सायकल क्रमांक एम पी ६८ एमइ ३९४९ ही सुद्धा ११ फेब्रुवारीला चोरल्याची कबुली दिली. या गुन्ह्या प्रकरणी आरोपी सायला मानसिंग बारेला यास अटक करण्यात आली आहे. ही कारवाई पोलीस निरीक्षक डॉ. विशाल जयस्वाल यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कर्मचारी ईश्वर चव्हाण, किशोर सपकाळे, सचिन घुगे, प्रमोद पाटील, विशाल पाटील, महेश मोगरे, अमोल जाधव, विकार शेख, तथागत सपकाळे यांनी केली. आरोपीच्या ताब्यातून दोन्ही मोटार सायकल पोलिसांनी जप्त केल्या आहेत.