रावेर मराठा समाज विकास मंडळाचा जरांगेंना पाठिंबा
७ नोव्हेंबरला तहसील कार्यालयासमोर उपोषण
कृषीसेवक न्यूज नेटवर्क / रावेर
मराठा समाजाला आरक्षण मिळण्यासाठी अंतरवली सराटी जि जालना येथे मनोज जरांगे पाटील यांचे आमरण उपोषण सुरु आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावे व त्यांच्या उपोषणाला रावेर तालुका मराठा समाज विकास मंडळाने पाठिंबा दिला आहे. बुधवारी समाजाच्या सभागृहात संचालक मंडळाच्या झालेल्या बैठीकीत हा निर्णय घेण्यात आला असून येत्या ७ नोव्हेंबरला जरंगेंच्या उपोषणाला पाठींबा दर्शविण्यासाठी येथील तहसील कार्यालयासमोर एक दिवस मराठा समाज बांधवांतर्फे लाक्षणिक उपोषण करण्यात येणार आहे. उपोषणाला पाठिंबा असल्याचे निवेदन तहसीलदार बी ए कापसे यांना समाज विकास मंडळातर्फे निवेदन देण्यात आले. यावेळी मंडळाचे अध्यक्ष राहुल पंडित, माजी आमदार अरुण पाटील, माजी अध्यक्ष डॉ एस आर पाटील, सचिव वामनराव पाटील, दिलीप पाटील, आर बी महाजन, डॉ मनोहर पाटील, युवराज महाजन, एड व्ही पी महाजन, भगवान गायकवाड यांच्यासह मंडळाचे पदाधिकारी उपस्थित होते. लाक्षणिक उपोषणाला रावेर तालुक्यातील समाज बांधवांनी उपस्थित राहावे असे आवाहन मंडळातर्फे करण्यात आले आहे.