रावेर तालुक्यातील 41 ग्रामपंचायतीची सूत्रे येणार महिलांच्या हाती : खानापूर, चिनावल, ऐनपूर, निंभोरा बुद्रुकची सत्ताकेंद्र राहणार महिला

तहसील कार्यालयात आरक्षण सोडत

रावेर तालुक्यातील 41 ग्रामपंचायतीची सूत्रे येणार महिलांच्या हाती : खानापूर, चिनावल, ऐनपूर, निंभोरा बुद्रुकची सत्ताकेंद्र राहणार महिला

प्रतिनिधी/ रावेर

रावेर तालुक्यातील 82 ग्रामपंचायत साठी आरक्षण काढण्यात आले असून त्यापैकी 41 ग्रामपंचायत महिलांच्या हाती शासनाने आरक्षणनुसार सोपवल्या आहेत. प्रांतधिकारी बबनराव काकडे यांच्या अध्यक्षतेखाली येथील तहसील कार्यालयात झालेल्या सभेत महिला आरक्षणाची सोडत काढण्यात आली. यावेळी तहसीलदार बी ए कापसे, निवासी नायब तहसीलदार संजय तायडे, मंडळ अधिकारी विठोबा पाटील, सचिन पाटील, यासिन तडवी उपस्थित होते. सध्या ज्या ठिकाणी महिला आरक्षण आहे अशा ग्रामपंचायत यावेळी आरक्षणातून वगळण्यात आल्या असून उर्वरित ग्रामपंचायतीसाठी महिला आरक्षण पुढीलप्रमाणे: 

अनुसूचित जाती महिला आरक्षण : पाडले खुर्द(महिला),खानापूर, -महिला

 अनुसूचित जमाती- 6 ग्रामपंचायत महिला राखीव : चिनावल (महिला),भोर (महिला), सुदगाव (महिला), दोधे (महिला), थेरोळे (महिला), वाघोड (महिला)

नामाप्र 8 ग्रामपंचायत महिला राखीव: 

उटखेडा (महिला), सुनोदा (महिला), अजनाड-चोरवड (महिला), विवरे बुद्रुक, (महिला), रणगाव (महिला), खिर्डी खुर्द, (महिला),वाघाडी (महिला), अजंदे(महिला)

सर्वसाधारण-22 ग्रामपंचायत महिला राखीव: रेंभोटा (महिला), पुरी-गोलवाडा (महिला), गाते (महिला), कोचुर खुर्द (महिला), गौरखेडा(महिला), रायपुर(महिला), कोळोदे(महिला), नांदूरखेडा( महिला), सावखेडा खुर्द (महिला), विटवे(महिला), निंबोल(महिला), अंदलवाडी(महिला), ऐनपूर(महिला), उदळी खुर्द( महिला) शिंगाडी(महिला), मोरगाव खुर्द( महिला),निंभोरासीम(महिला), शिंदखेडा( महिला), मस्कावद खुर्द( महिला), मोरगाव बुद्रुक (महिला), निंभोरा बुद्रुक( महिला), धुरखेडा (महिला)

--