BREKING : रावेर-सावदा रस्त्यावर मोटारसायकल अपघातात पतीपत्नी जखमी
महिला उपचारासाठी रवाना

प्रतिनिधी/ रावेर
रावेर सावदा रस्त्यावर बिंबे पेट्रोल पंपाजवळ मोटारसायकलच्या झालेल्या अपघातात पतिपत्नी जखमी झाले आहे. ही घटना शनिवारी संध्यकाळी सात वाजेच्या सुमारास घडली.
केऱ्हाळा बुद्रुक येथील रहिवासी काशिनाथ कौतिक मसाने हे पत्नी सयाबाईसह मोटार सायकलने वडगाव येथे नातेवाईकांकडे गेले होते. तेथून परत रावेरकडे येत असतांना शहराच्या बाहेरील बिंबे पेट्रोल पंपाजवळ त्यांच्या मोटारसायकलला अपघात झाला. या अपघातात पतिपत्नी जखमी झाले असून त्यांच्यावर येथील ग्रामीण रुग्णालयात वैद्यकीय अधिकारी डॉ वीरेंद्र काटकर, परिचारिका सुनीता वसावे व कर्मचाऱ्यांनी उपचार केले. सयाबाई या अपघातात गंभीर जखमी असल्याने त्यांना पुढील उपचारासाठी बऱ्हाणपूर येथे पाठवण्यात आले आहे. तर काशिनाथ मसाने यांच्यावर रावेर ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरु आहेत.