BREKING : रावेर बाजार समितीच्या सभापती व उपसभापती विरुद्ध अविश्वास प्रस्ताव दाखल

रावेर तालुक्यात खळबळ

BREKING : रावेर बाजार समितीच्या सभापती व उपसभापती विरुद्ध अविश्वास प्रस्ताव दाखल

रावेर/प्रतिनिधी

येथील कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती सचिन पाटील व उप सभापती योगेश पाटील यांच्या विरुद्ध संचालकांनी जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्याकडे आज अविश्वास प्रस्ताव दाखल केला आहे. यामुळे राजकीय व सहकार क्षेत्रात खळबळ उडाली आहे. माजी आमदार अरुण पाटील यांनी दोन दिवसापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटातून भाजप मध्ये प्रवेश केला आहे. या घटनेनंतर झालेल्या या राजकीय भूकंपामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. 

आज जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्याकडे येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालकांनी सभापती सचिन पाटील व उप सभापती योगेश पाटील हे संचालक मंडळाला विश्वासात न घेता मनमानी पद्धतीने कारभार करतात या कारणावरून अविश्वास प्रस्ताव दाखल करण्यात आला आहे. या प्रस्तावावर कोणत्या संचालकांच्या स्वाक्षरी आहेत हे समजू शकलेले नाही. दरम्यान, बाजार समितीच्या निवडणुकीनंतर सभापती व उपसभापती पदासाठी संचालकांना संधी देण्याचे ठरल्या प्रमाणे कार्यवाही होत नसल्याने काही संचालकांनी नाराजीचा सूर व्यक्त होत होता. अविश्वास प्रस्ताव दाखल करण्यात आल्याच्या घटनेला संचालकांनी दुजोरा दिला आहे. अविश्वास प्रस्ताव दाखल करण्यामागे हे कारण असण्याचीही शक्यता नाकारता येत नाही. यामुळे मात्र तालुक्यात खळबळ उडाली आहे.