रा का इंटरनॅशनल इंग्लिश स्कुलला सिबिएससी बोर्डाची मान्यता : रावेर तालुक्यातील निवासी विद्यार्थ्यांची एकमेव शाळा

शैक्षणिक गुणवत्तेवर राहणार अधिक भर

रा का इंटरनॅशनल इंग्लिश स्कुलला सिबिएससी  बोर्डाची मान्यता : रावेर तालुक्यातील निवासी विद्यार्थ्यांची एकमेव शाळा

प्रतिनिधी/रावेर 

येथील अजंदा रोडवरील रा. का. इंटरनॅशनल इंग्लिश मेडीयम स्कुलला नवी दिल्ली येथील केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने (Central Board of Secondary Education -CBSE) मान्यता दिली आहे. शिवजयंतीच्या शुभ पर्वावर या शाळेला ही मान्यता मिळाल्याने रावेर व मुक्ताईनगर तालुक्यातील विद्यार्थ्यांची गुणवत्तापूर्ण व दर्जेदार शिक्षणाची सोय होणार आहे. सीबीएससी मंडळाची मान्यताप्राप्त रावेर तालुक्यातील निवासी विद्यार्थ्यांची ही पहिली व एकमेव शाळा ठरली आहे.  

येथील मधुर फाउंडेशन संचलित रा. का. इंटरनॅशनल इंग्लिश मेडीयम स्कुलने 2021 पासून बालवाटिका सुरु केली होती. पालकांचा दरवर्षी वाढता प्रतिसाद व शाळेने विद्यार्थ्यांकडे दिलेले वैयक्तिक लक्ष यामुळे अल्पावधित नवलौकिक प्राप्त केला आहे. केंद्रीय शिक्षण मंडळाच्या टीमने शाळेला भेट देऊन पाहणी केली होती. शिक्षणाचा उत्तम दर्जा, विद्यार्थ्यांना दिल्या जाणाऱ्या भौतिक सुविधा, डिजिटल क्लासरूम, प्रशस्त इमारत, भव्य क्रिडांगण, विविध ग्रंथसंपदा व शैक्षणिक पुस्तकांनी सुसज्ज असलेली लायब्ररी, अद्यावत प्रयोगशाळा, विद्यार्थ्यांच्या निवासाची उत्तम सोय, प्रशिक्षित शिक्षकवर्ग, व प्रत्येक विद्यार्थ्यांकडे दिले जाणारे वैयक्तिक लक्ष यामुळे ही शाळा नवी दिल्लीच्या केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या( CBSE ) निकषात पात्र ठरली आहे. आज शिवजयंतीच्या शुभ पर्वावर ही मान्यता प्रदान करण्यात आली असून संलग्नता क्रमांक 1131598 आहे. या शाळेला 10 वी पर्यंत मान्यता देण्यात आली आहे. निसर्गरम्य वातावरणात साडेसहा एकर विस्तीर्ण जागेवर ही शाळा असून निवासी वसतिगृह (हॉस्टेल) असलेली रावेर तालुक्यातील ही पहिली व एकमेव इंग्रजी माध्यमाची सीबीएससी शाळा आहे. यामुळे रावेर व मुक्ताईनगर तालुक्यातील विद्यार्थ्यांची दर्जेदार शिक्षणाची सोय झाली आहे. विद्यार्थ्यांकडे अधिक लक्ष देता यावे यासाठी शाळेचे संस्थाचालक व शिक्षक शाळेच्याच इमारतीत निवासी असतात. 

"रावेर परिसरातील विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षणाची सुविधा उपलब्ध करून देण्यासह त्यांच्यातील सुप्त कलागुणांना चालना देण्यावर शाळेचा भर दिला जातो. गुणवत्तापूर्ण शिक्षणासह विविध स्पर्धाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी शाळेचा प्रयत्न आहे. पालकांचा विश्वास, गुणवत्तापूर्ण व दर्जेदार शिक्षण, विद्यार्थ्यांच्या निवासाची उत्तम व्यवस्था व पालकत्वाच्या भूमिकेतून विद्यार्थ्यांशी साधला जाणारा संवाद यामुळे स्कुलने शैक्षणिक क्षेत्रात एक स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे. "

------महेंद्र पवार, अध्यक्ष रा का इंटरनॅशनल इंग्लिश स्कुल, रावेर