शेतकऱ्यांनी कापसाची उत्पादकता वाढविणे आवश्यक : जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांचे आवाहन

पळसखेडयात जागतिक कापूस दिनानिमित्त परिसंवाद

शेतकऱ्यांनी कापसाची उत्पादकता वाढविणे आवश्यक : जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांचे आवाहन
शेतकऱ्यांनी कापसाची उत्पादकता वाढविणे आवश्यक : जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांचे आवाहन

जामनेर / प्रतिनिधी  

कापूस लागवडी खालील सर्वात जास्त क्षेत्र जळगाव जिल्ह्यात असून या पिकाची उत्पादकता मात्र कमी आहे.शेतकऱ्यांनी कापूस उत्पादनाकडे अधिक लक्ष देऊन कापसाची उत्पादकता वाढण्याची आवश्यकता आहे. उत्पादकता आणि बाजारपेठ  याचा शेतकऱ्यांनी विचार करावा असे आवाहन जिल्हाधिकारी प्रसाद यांनी यावेळी केले. जागतिक कापूस दिनानिमित्त पळासखेडे मिराचे (ता. जामनेर) येथील दिनेश रघुनाथ पाटील यांच्या कापसाच्या शेतामध्ये जैन इरीगेशन आणि साऊथ एशिया जैव तंत्रज्ञान संस्था जोधपूर आयोजीत कापूस परीसंवाद कार्यक्रम घेण्यात आला. त्यावेळी कापसाच्या पाहणीनंतर शेतकऱ्यांशी संवाद साधताना जिल्हाधिकारी आयुष प्रसाद बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी करमाडचे प्रगतीशील शेतकरी संजय दशरथ पाटील होते 

कापूस हे आपल्या राज्यातील महत्वाचे नगदी पिक आहे.  ४२ लाख क्षेत्रावर कापसाचे पिक घेतले जाते. उत्पादकता खुप कमी  हेक्टरी ३३६ किलो रूई आहे. यावेळी जैन ठिबकवरील कापूस पिकास त्यांनी भेट देऊन पिकाची पाहणी केली. पिकामध्ये गुलाबी बोंडअळी व्यवस्थापनाकरीता वापरण्यात करण्यात आलेल्या जपानी पीबी नॉट तंत्रज्ञानबाबत जैन इरीगेशनचे वरीष्ठ कृषी शास्त्रज्ञ डॉ.बी डी जडे यांनी माहीती दिली. या तंत्रज्ञानाचे निष्कर्ष शेतकऱ्यासाठी फायदेशीर आहे. कृषी संशोधन केंद्र ममुराबादचे कापूस पैदासकार डॉ. गिरीश चौधरी यांनी जागतिक कापूस दिनाचे महत्व, त्याचा उद्देश ह्यावर माहीती दिली. कापूसतज्ञ डॉ. संजीव पाटील यांनी कापसाचे वाण निवडीचे निकष, लागवड अंतर, झाडांची संख्या तसेच कापूस पिकातील व्यवस्थापन बाबत मनोगत व्यक्त केले. डॉ.बी डी जडे यांनी कॉटन मिशन २.० मध्ये कापूस पिकाचे उत्पादन कसे मिळवावे तसेच कापूस लागवड गादी वाफा, मल्चिंग फिल्म, ठिबक सिंचन आणि फर्टीगेशनाचा वापर करण्याचा शेतकऱ्यांना आग्रह केला. उपविभागीय कृषी अधिकारी रमेश जाधव यावेळी उपस्थित होते. कार्यक्रमाकरीता जैन इरीगेशनचे विभागीय व्यवस्थापक दिलीप बऱ्हाटे, विक्री अभियंता मनोज पाटील, जैन ठिबक वितरक दिनेश पाटील, अजय पाटील, सुशांत चतुर, पी के पाटील, देवेंद्र पाटील आणि परीसरातील अनेक शेतकरी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन तिर्थराज इंगळे यांनी केले