समाजात तेढ निर्माण करणाऱ्या पोस्ट टाकल्यास शांतता भंग करणाऱ्यांची गय नाही : पोलीस अधीक्षक अशोक नखाते यांचा इशारा

रावेरला रोजा इफ्तार पार्टीचे आयोजन

समाजात तेढ निर्माण करणाऱ्या पोस्ट टाकल्यास शांतता भंग करणाऱ्यांची गय नाही : पोलीस अधीक्षक अशोक नखाते यांचा इशारा

प्रतिनिधी/ रावेर

नागरिकांनी सोशल मीडियात व्हायरल होणाऱ्या भावना भडकवणाऱ्या पोस्टवर विश्वास न ठेवता याची माहिती पोलिसांना द्यावी. कायदा हातात घेण्याचा प्रयत्न करणाऱ्यांची कोणत्याही परिस्थितीत गय केली जाणार नाही असा इशारा अप्पर पोलीस अधीक्षक अशोक नखाते यांनी दिला. रावेर येथे पोलीस ठाण्यातर्फे आयोजित इफ्तार पार्टी कार्यक्रमात बोलत होते.

व्यासपीठावर डी वाय एस पी कृष्णात पिंगळे, पोलीस निरीक्षक डॉ विशाल जयस्वाल व मौलाना उपस्थित होते. श्री नखाते पुढे म्हणाले की, पोलिसांसमोर अनेक आव्हाने आहेत. दिवसेंदिवस ताण वाढत आहे. नागरिकांचे संरक्षण करण्याची जबाबदारी पोलीस विभाग योग्यरीतीने पार पाडत आहे. मात्र काही जण सोशल मीडियावर भावना भडकवणाऱ्या पोस्ट टाकून समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करत असतील तर त्यांच्यावर कडक कारवाई केल्याशिवाय राहणार नाही. अशा पोस्ट असतील तर पोलिसांना माहिती द्या, कायदा हातात घेण्याचा प्रयत्न करू नका. कायदा भंग करणाऱ्यांवर कारवाई केली जाईल असा इशारा त्यांनी दिला. आगामी सण उत्सवनिमित्त श्री नखाते यांनी नागरिकांना शुभेच्छा दिल्या. यावेळी शफिउद्दीन सर यांनी रमजान महिन्याचे महत्व सांगितले. दिलीप कांबळे यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी एपीआय अंकुश जाधव, पीएसआय घनशाम तांबे, पीएसआय तुषार पाटील, माजी नगराध्यक्ष हरीश गणवानी, जेष्ठ नागरीक संघांचे अध्यक्ष डॉ एस आर पाटील, डॉ संदीप पाटील, सी एस पाटील, गयास शेख, गयास काझी, बाळू शिरतुरे, योगेश गजरे, पंकज वाघ, असिफ मोहम्मद,शरद राजपूत, अशोक शिंदे यांच्यासह शांतता समिती सदस्य, मुस्लिम पंच कमिटी सदस्य व नागरीक उपस्थित होते. आभार पोलीस निरीक्षक डॉ विशाल जयस्वाल यांनी मानले.