रावेर मतदार संघ राजकारण : महाविकस आघाडीचे उमेदवार श्रीराम पाटील याना मलकापूर नांदुरा भागातून सर्वाधिक मताधिक्य देणार
आमदार राजेश एकडे यांचा बैठकीत निर्धार ; मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
प्रतिनिधी / नांदुरा
रावेर लोकसभा मतदार संघातील महाविकास आघाडीचे उमेदवार श्रीराम पाटील यांनी मतदार संघाचा दौरा सुरु केला आहे. सोमवारी त्यांनी मलकापूर नांदुरा विधानसभा मतदार संघाचा दौरा केला. यावेळी त्यांनी मतदारांच्या गाठीभेटी घेऊन त्यांच्याशी सुसंवाद साधला जात आहे. मलकापुर व नांदुरा मतदार संघातुन लोकसभा मंतदारसंघाचे उमेदवार श्रीराम पाटील यांना सर्वाधिक लिड देणार असल्याचे आश्वासन आमदार राजेश ऐकडे यांनी दिले आहे.
महाविकास आघाडीची निवडणूक नियोजन बैठक नांदुरा येथे आमदार कार्यालयात घेण्यात आली . यावेळी बैठकीला रावेर लोकसभा मंतदार संघाचे उमेदवार श्रीराम पाटील उपस्थित होते. राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे जळगाव जिल्हाध्यक्ष रविंद्र पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. रावेर लोकसभा मतदार संघाचे उमेदवार श्रीराम पाटील यांचे बैठक स्थळी आगमन होताच उपस्थित महाविकस आघाडीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी जल्लोषात स्वागत केले.यावेळी रावेर लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार श्रीराम पाटील यांना सर्वाधिक मतांनी निवडून देण्याचे अवाहन जिल्हाध्यक्ष पाटील यांनी केले.
कार्यकर्त्यांनी स्वतः उमेदवार समजून काम करावे : ऍड रवींद्र भैय्या पाटील यांचे आवाहन कार्यकर्त्यांनी स्वतः उमेदवार समजून लोकसभा निवडणुकीत काम करावे व महाविकास आघाडीचे उमेदवार श्रीराम पाटील यांना प्रचंड मताधिक्याने विजयी करावे असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार गट) चे जिल्हाध्यक्ष ऍड रवींद्र भैय्या पाटील यांनी केले आहे. ते मलकापूर येथील आयोजित पदाधिकारी व कार्यकर्ते मेळाव्यात बोलत होते. लोकसभा निवडणूक नियोजन मेळावा मलकापुर शहरात राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाच्या कार्यालयात संपन्न झाला. यावेळी नांदुरा-मलकापुर मतदारसंघाचे आमदार राजेश ऐकडे, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गट महाराष्ट्र सरचिटणीस संतोष रायपुरे यांनी मनोगत व्यक्त केले. महाविकास आघाडीचे रावेर लोकसभा मंतदार संघाचे उमेदवार श्रीराम पाटील यांना नांदुरा व मलकापुर तालुक्यातुन जास्तीत-जास्त लीड देण्याचा निर्धार करण्यात आला.यावेळी महाविकास आघाडीचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.