रावेर तालुक्यात मोठी कारवाई ; गाजांच्या शेतीतून सव्वा सहा लाखांची झाडे जप्त

रावेर पोलिसांची कारवाई, एकास अटक

रावेर तालुक्यात मोठी कारवाई ; गाजांच्या शेतीतून सव्वा सहा लाखांची झाडे जप्त

प्रतिनिधी /रावेर

रावेर तालुक्यातील सहस्त्रलिंग शिवारात एका शेतात गांजाची लागवड केली असल्याची गुप्त माहिती पोलीस निरीक्षक डॉ विशाल जयस्वाल यांना मिळाली. त्यानुसार फौजफाटा घेवून पोलिसांनी प्रत्यक्ष शेतात जाऊन पाहणी केली असता तेथे गांजाची झाडे दिसून आली. एकूण ६ लाख २१ हजार ५२० रूपये किमतीची ९१ किलो ४०० ग्रॅम वजनाची गांजाची झाडे पोलिसांनी जप्त केली आहे. याप्रकरणी शाहरुख कासम तडवी रा. सहस्त्रलिंग यास अटक करण्यात आली आहे.

पोलिस निरीक्षक डॉ जयस्वाल यांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे लालमाती-सहस्त्रलिंग रस्त्याने या शिवारात गांजाच्या झाडांची लागवड करून त्याची जोपासना करीत असल्याचे समजले. त्यानुसार पोलीस निरीक्षकांनी स्वतःच्या नेतृत्वात एपीआय आशिष अडसूळ, पीएसआय सचिन नवले पोलिस कर्मचारी ईश्वर चव्हाण, जगदीश पाटील, कल्पेश अमोदकर, मुकेश मेढे, महेश मोगरे ,विकार शेख, प्रमोद पाटील ,समाधान ठाकूर, सचिन घुगे, सुकेश तडवी, संभाजी बिजगारे, तालुका कृषी अधिकारी भाऊसाहेब वाळके यांचे पथक घेवून सदर ठिकाणी खात्री केली. या ठिकाणी आरोपी अक्रम कासम तडवी व शाहरुख कासम तडवी दोघे रा. सहस्त्रलिंग यांच्या शेतात जाऊन पाहणी केली असता तेथे गांजाची झाडे लावलेली दिसून आली. ही सर्व झाडे पोलिसांनी नष्ट करून जप्त केली आहेत. एकूण सहा लाख २१ हजार ५२० रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे. तर वरील दोघे आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून शाहरुख तडवी याला अटक करण्यात आली आहे. सदर गुन्ह्याचा तपास उप निरीक्षक सचिन नवले करीत आहेत.