हा घ्या पुरावा...कोचुर खुर्दच्या सरपंचाचा जातीचा दाखला बनावट व बोगसच : जळगाव तहसीलदारांच्या पत्रावरून सिद्ध
गुन्हा दाखल करण्यासाठी ग्रा. प. सदस्यांचा उपोषणाचा इशारा...
प्रतिनिधी/ रावेर
तालुक्यातील कोचुर खुर्द येथील सरपंच सौ. ज्योती संतोष कोळी यांनी ग्रामपंचायत निवडणुकीवेळी दिलेला जातीचा दाखला बनावट व बोगस असल्याचा पुरावा प्राप्त झाला आहे. ज्योती कोळी यांचा हा दाखला जळगाव तहसील कार्यालयातून निर्गत झालेला नसल्याचे पत्र तहसीलदारांनी दिले आहे. त्यामुळे निवडणुकीत वापरलेल्या बनावट बोगस जातीच्या दाखल्याची तात्काळ चौकशी करून गुन्हा दाखल करण्याची मागणी कोचूर ग्रामपंचायत सदस्यांनी केली आहे. अन्यथा आमरण उपोषण करण्यात येईल असा इशारा या ग्रामपंचायतीच्या सदस्यांनी रावेर तहसीलदारांना दिलेल्या निवेदनाद्वारे दिला आहे.
कोचूर खुर्द येथील सरपंच सौ ज्योती संतोष कोळी (माहेरचे नाव - ज्योती ब्रिजलाल कोळी )यांनी टोकरे कोळी जातीचा बनावट बोगस सही शिक्क्यांचा दाखला तयार करून अनुसूचित जमाती जागेसाठी सरपंच पदाची निवडणूकलढवली होती. या निवडणुकीत त्या विजयी झाल्या होत्या. मात्र निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना सादर केलेला जातीचा दाखला बनावट असल्याचे जळगावच्या तहसीलदारांनी दिलेल्या पत्राद्वारे सिद्ध झाले आहे.
बनावट बोगस टोकरे कोळी जातीचा दाखला बनावट असल्याचा पुराव्यानिशी रावेर तहसीलदार यांच्याकडे तक्रार करून चौकशी करण्याची मागणी यापूर्वीच ग्रामपंचायत सदस्यांनी केली आहे. तहसीलदार बी ए कापसे यांनी याची दखल घेऊन सरपंच सौ ज्योती कोळी यांना म्हणणं मांडण्यासाठी 26 जून रोजी हजर राहण्यास नोटीसीद्वारे कळविण्यात आले होते. मात्र यावेळी सरपंच ज्योती कोळी यांनी खुलासा सादर करण्यासाठी मुदत मिळण्यासाठी अर्ज सादर केला आहे. तहसीलदार रावेर यांनी पुढील सुनावणी तात्काळ करून व याप्रकरणाची चौकशी करावी. शासनाची फसवणूक करणाऱ्या सरपंच ज्योती कोळी यांच्यावर गुन्हा दाखल करावा अन्यथा आमरण उपोषण करण्यात येईल असा इशारा ग्रामपंचायत सदस्य लिलाबाई तायडे, कविता पाटील, गणेश महाजन, प्रशांत तायडे, रेश्मा तायडे यांनी निवेदनाद्वारे दिला आहे
सरपंच सौ ज्योती संतोष कोळी (सासरचे नाव )यांनी निवडणुकीत सादर केलेला जातीचा दाखला जळगाव तहसीलदार यांचा आहे. मात्र या कार्यालयातून सदर ज्योती ब्रिजलाल कोळी (माहेरचे नाव) या नावाचा जातीचा दाखला निर्गत केलेला नसल्याचे पत्र 6 डिसेंबर 2023 रोजी जळगाव तहसीलदारांनी दिले आहे. त्यामुळे हा दाखला बनावट व बोगस असल्याचे या शासकीय पुराव्यावरून सिद्ध होते.

krushisewak 
