आमदार अमोल जावळे यांची तत्परता : जिबीएस सदृश्य लक्षणे असलेल्या रुग्णावर तात्काळ उपचार करण्याच्या जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांना सूचना

रुग्णावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरु

आमदार अमोल जावळे यांची तत्परता : जिबीएस सदृश्य लक्षणे असलेल्या रुग्णावर तात्काळ उपचार करण्याच्या जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांना सूचना

प्रतिनिधी / रावेर 

रावेर तालुक्यातील थेरोळा येथील एका 22 वर्षीय युवकामध्ये जिबीएस सदृश्य लक्षणे आढळून आल्याची माहिती आमदार अमोल जावळे यांना समजली. त्यांनी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ भायेकर यांच्याशी संपर्क साधत संबंधित रुग्णावर तातडीने उपचार करण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार आरोग्य विभागाने सदर रुग्णाला जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. 

तालुक्यातील थेरोळा येथील एक 22 वर्षीय युवक कुंभमेळ्यासाठी प्रयागराज येथे गेला होता. मात्र घरी परतल्यावर त्याला त्रास होऊ लागल्याने बऱ्हाणपूर येथील एका खासगी रुग्णालयात उपचार घेतले. उपचार करणाऱ्या डॉक्टरांना जिबीएस सदृश्य लक्षणे आढळून आल्याने त्याला पुढील उपचार तज्ञ न्युरोलॉजिस्टकडे घेण्याच्या सूचना देत डिस्चार्ज दिला होता. याची माहिती माध्यमातून आमदार अमोल जावळे यांना समजताच त्यांनी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ श्री भायेकर यांच्याशी संपर्क साधला. व सदर रुग्णाला तातडीने पुढील उपचार सुविधा पुरविण्याच्या सूचना केल्या. तालुका आरोग्य अधिकारी डॉ अमोल भंगाळे यांनी ऐनपूर प्राथमिक आरोग्य केंद्राचे पथक थेरोळा येथे पाठवून सदर रुग्णाला जिल्हा रुग्णालयात उपचारर्थ दाखल करण्यात आले आहे. त्याच्यावर पुढील उपचार सुरु करण्यात आले असल्याची माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ अमोल भंगाळे यांनी दिली. आमदार अमोल जावळे यांची तत्परता व घेतलेली दखल यामुळे संबंधित युवकावर उपचार सुरु झालेले आहेत.