कृषीसेवकतर्फे रावेरला उद्या भूमिपुत्रांचा गौरव सोहळा : राज्यातील ३१ जणांना पुरस्काराचे होणार वितरण
स्व भवरलालजी जैन यांची प्रेरणादायी पुस्तके दिली जाणार भेट
प्रतिनिधी / रावेर
महाराष्ट्र राज्यातील शेती व शेतीशी संबधीत क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व समाजासाठी प्रेरक ठरणाऱ्या भूमिपुत्रांना साप्ताहिक कृषिसेवकतर्फे राज्यस्तरीय पुरस्कार देऊन आज मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात येणार आहे. हा गौरव सोहळा येथील कै श्रीमती शेनाबाई गोंडू पंडित मराठा समाज मंगल कार्यालयात सकाळी ११ वाजता संपन्न होत आहे. सन्मानपत्र स्मृतिचिन्ह व जैन इरिगेशनचे संस्थापक स्व. भवरलालजी जैन यांची प्रेरणादायी पुस्तके देऊन पुरस्कारार्थीना सन्मानित केले जाणार आहे.
कृषीसेवकतर्फे या सोहळ्याचे आयोजन करण्यात आले असून जैन इरिगेशन, महालक्ष्मी बायोजिनीक्स माउली फाउंडेशन व भारती ज्वेलर्स यांचे सहकार्य लाभले आहे. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी आमदार अरुण पाटील उपस्थित राहणार असून कार्यक्रमाचे उदघाटन माजी मंत्री आ एकनाथराव खडसे करतील. पुरस्कार वितरण खासदार रक्षा खडसे व आमदार शिरीष चौधरी यांच्या हस्ते होणार आहे. नांगरपूजन जैन इरिगेशनचे सह व्यवस्थापकीय संचालक अजित जैन करणार असून गौरव विशेषांकाचे प्रकाशन माजी खासदार डॉ उल्हास पाटील यांच्या हस्ते संपन्न होईल. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून माफदा संघटनेचे अध्यक्ष विनोद तराळ पाटील, मुख्याध्यापक महामंडळाचे राज्याध्यक्ष जे के पाटील भाजप प्रदेश सरचिटणीस सुरेश धनके, जिल्हा कृषी अधीक्षक आर बी चलवदे, जेष्ठ केळी तज्ज्ञ डॉ के बी पाटील, माजी कृषी संचालक अनिल भोकरे, भाजपचे जिल्हाध्यक्ष अमोल जावळे, ड्रीप असोसिएशनचे जिल्हाध्यक्ष सोपान पाटील, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष रंजना पाटील, शिवसेना जिल्हा उपप्रमुख योगीराज पाटील, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष नंदकिशोर महाजन, तहसीलदार बी ए कापसे, एपीआय आशिषकुमार अडसूळ, तालुका कृषी अधिकारी भाऊसाहेब वाळके, उद्योजक श्रीराम पाटील, उद्योजक डॉ प्रशांत सरोदे, उद्योजक अमित भारंबे , कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती सचिन पाटील, माजी सभापती श्रीकांत महाजन, माजी नगराध्यक्ष हरीश गणवाणी, फैजपूरचे माजी नगराध्यक्ष पांडुरंग सराफ, मराठा समाज विकास मंडळाचे अध्यक्ष राहुल पंडित, माउली फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ संदीप पाटील, दत्तछाया फाउंडेशनचे अध्यक्ष राजेंद्र चौधरी, भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष पद्माकर महाजन, जळगाव ऍग्रो फार्मर प्रोड्युसर कंपनीचे सीईओ सी एस पाटील, रावेर तालुका ऍग्रो डीलर असोसिएशनचे तालुकाध्यक्ष सुनील कोंडे यांच्यासह मान्यवर उपस्थित राहणार आहे.९ व्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून राज्यातील शेती क्षेत्रातील ३१ जणांचा यावेळी सन्मानपत्र, स्मृतिचिन्ह देऊन सन्मान करण्यात येणार आहे.