कृषीसेवकतर्फे राज्यस्तरीय पुरस्काराने भूमिपुत्रांचा होणार गौरव

रावेरला २६ नोव्हेंबरला राज्यस्तरीय पुरस्कार वितरण सोहळा

कृषीसेवकतर्फे राज्यस्तरीय पुरस्काराने भूमिपुत्रांचा होणार गौरव

प्रतिनिधी / रावेर

शेती व शेतीशी संबधीत क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व समाजासाठी प्रेरक ठरणाऱ्या राज्यातील भूमिपुत्रांना दरवर्षी साप्ताहिक कृषिसेवकतर्फे वर्धापन दिनानिमित्ताने *राज्यस्तरीय पुरस्काराने* गौरविण्यात येते. यंदाचे पुरस्काराचे हे सहावे वर्ष आहे. शाल, पुष्पगुच्छ, सन्मानपत्र, स्मृतीचिन्ह असे पुरस्काराचे स्वरूप आहे. महाराष्ट्र राज्यातील उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींचा मान्यवरांच्या हस्ते व उपस्थितीत गौरविण्यात येणार आहे. या कार्यक्रमाचे आयोजन रावेर ता. रावेर जि. जळगाव येथे 26 नोव्हेंबर 2023 रोजी करण्यात येणार आहे.

पुरस्करार्थींच्या कार्याची चित्रफीत होणार प्रसारित 

शेतीत व शेतीशी निगडित क्षेत्रात काम करताना स्वतःच्या कौशल्याने प्रगती करीत इतरांसाठी प्रेरणादायी ठरणाऱ्या व्यक्तींचा कृषिसेवकतर्फे दरवर्षी सन्मान करण्याची परंपरा आहे. निवड झालेल्या पुरस्कारार्थींच्या कार्याची समाजाला ओळख व्हावी या हेतूने त्यांच्या कार्याची चित्रफीत तयार करण्यात येणार आहे. या चित्रफितीचे प्रसारण कार्यक्रमस्थळी तसेच कृषीसेवकच्या सोशल व डिजिटल माध्यमाद्वारे केले जाणार आहे.

या गटातून निवडले जाणार पुरस्कारार्थी 

या सोहळ्यात आदर्श शेतकरी, आदर्श महीला शेतकरी, आदर्श युवा शेतकरी, आदर्श कृषी शास्त्रज्ञ, आदर्श कृषी तज्ञ, आदर्श कृषी उद्योजक, आदर्श कृषी मित्र, आदर्श कृषी विज्ञान केंद्र, आदर्श कृषी विज्ञान मंडळ/ आदर्श शेतकरी कंपनी/आदर्श शेतकरी गट, आदर्श कृषी व्यावसायिक या गटातून पुरस्कार दिले जाणार आहेत. निवड झालेल्या पुरस्कारार्थिंच्या कार्याचा आढावा असलेला परिचय विशेषांक यावेळी मान्यवरांच्या हस्ते प्रकाशित केला जाणार आहे. यासाठी विविध गटातील उत्कृष्ट कार्य करणाऱ्या व्यक्ती व संस्थांकडून प्रस्ताव मागविण्यात आले आहेत.  इच्छुकांनी त्यांचे प्रस्ताव खालील ईमेलवर अथवा व्हॉट्स अप क्रमांकावर पाठवावेत.  संपर्क--  9404243515 email -krushisevak2014@gmail.com