BREAKING : पुणे रावेर बसला फुलंब्री जवळ अपघात : 3 प्रवाशी जखमी : 22 प्रवाशी बचावले

स्कुल बसला वाचविण्याच्या प्रयत्नात अपघात

BREAKING : पुणे रावेर बसला फुलंब्री जवळ अपघात : 3 प्रवाशी जखमी : 22 प्रवाशी बचावले

प्रतिनिधी /रावेर

पुण्यावरून रावेरला येणाऱ्या रावेर आगाराच्या पुणे रावेर बसला फुलंब्री जवळ अपघात झाल्याची घटना आज मध्यरात्री 2:45 वाजेच्या सुमारास घडली. या अपघातात 3 प्रवाशी जखमी झाले असून 22 प्रवाशी थोडक्यात बचावले आहेत. अचानक वळण घेणाऱ्या स्कुल बसला वाचविताना चालकाचे बसवरील नियंत्रण सुटल्याने बस डिव्हायडरला धडकल्याने हा अपघात घडला आहे. 

रावेर आगाराची बस क्र MH-09-FL-0468 ही पुण्यावरून आज मध्यरात्री पावणे तीन वाजता रावेरकडे येत येत होती. महामार्गवरील फुलंब्री जवळील हॉटेल साईप्रसादसमोर मठ पाटी समोर बस आली असता बसच्या वाहक बाजूने जाणाऱ्या स्कूल बसच्या चालकाने अचानक स्कूल बस उजवीकडे वळविल्याने बसचालक सचिन बागूल (रावेर आगार )यांनी त्यांच्या ताब्यातील बस उजवीकडे घेण्याचा प्रयत्न करताना बस रस्त्यावरील डिव्हायडरला धडकल्याने हा अपघात घडला आहे. या अपघातात बसमधील एकूण 22 प्रवाशी थोडक्यात बचावले आहेत. तर योगेश रघुनाथ जोशी, यशोदाबाई विश्वनाथ कुमावत, मोहम्मद मोसिन he तिघे प्रवाशी जखमी झाले आहेत. घटनेची माहिती मिळताच एस टी महामंडळाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. बसचे तीन लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज एसटी महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी वर्तवला आहे.