स्व. मधुकरराव चौधरी यांच्या जयंतीनिमित्त हरित दिंडी उपक्रमाचे आयोजन : सातपुड्यात ९७ वृक्षांचे वृक्षारोपण
“हिरवा सातपुडा” या संकल्पनेकडे वाटचाल
प्रतिनिधी / रावेर
माजी विधानसभाध्यक्ष व लोकसेवक मधुकरराव चौधरी यांच्या ९७ व्या जयंतीनिमित्त ‘हरित दिंडी’ उपक्रमांतर्गत ९७ झाडांचे सातपुड्यात वृक्षारोपण करण्यात आले. हा उपक्रम पाल येथील सुकी धरण परिसरात राबविण्यात आला. स्व.मधुकरराव चौधरी यांच्या प्रतिमेस अभिवादन करून वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी माजी आमदार शिरीष चौधरी यांच्या हस्ते वृक्षारोपण करून हरित दिंडी उपक्रमाची सुरुवात करण्यात आली. स्व. चौधरी यांच्या ‘हिरवा सातपुडा’ या दूरदृष्टीपूर्ण स्वप्नाकडे सुरु असलेली ही वाटचाल आहे. या संकल्पनेतून निसर्ग आणि वन्यजीवाचे संवर्धन यासोबतच आदिवासी जीवन आणि संस्कृतीचा सर्वांगीण विकास साधण्याचा उद्देश आहे.
स्व. चौधरी यांनी संपूर्ण आयुष्य भेदभावमुक्त समाज उभारण्यासाठी अर्पण केले. समाजातील विविध संस्कृतींचा सन्मान राखून, त्या एकत्र गुंफून, माणसांमध्ये ऐक्य व सलोखा निर्माण करण्याचे कार्य त्यांनी केले. त्यांचे विचार आणि कार्य भावी पिढ्यांसाठी प्रेरणादायी ठरणार आहेत. या कार्यक्रमाच्या आयोजनासाठी मधुस्नेह संस्था परिवार व लोकसेवक प्रतिष्ठान यांनी पुढाकार घेतला. तसेच स्थानिक वनविभाग व यावल वन्यजीव अभयारण्याचे अधिकारी यांनी सहकार्य केले. यावेळी धनंजय चौधरी, डॉ.राजेंद्र पाटील, लिलाधर चौधरी, कुमार चौधरी, किशोर महाजन, शेखर पाटील, हमीद तडवी, कामिल तडवी, संजू जमादार, उस्मान तडवी, महेश महाजन, सुधाकर झोपे, मो.हकीम मो.याकुब, सुनिल फिरके, नईम शेख, अनिल जंजाळे, रतन बारेला, किशोर चौधरी, सरफराज तडवी, लियाकत जमादार, लक्ष्मण मोपारी, संजय पवार, बबलू तडवी, संजय भालेराव, महेबूब जमादार, देविदास हडपे, यशवंत महाजन, भरत चौधरी, डिगंबर चौधरी, ललित चौधरी, अनिल तडवी, राजू चौधरी, अनिल महाजन, सुरज पाटील, राहुल पाटील, विजय कोळी, व्ही.आर.पाटील, आर.एल. चौधरी, उत्तम चव्हाण, रमेश झांबरे, रवींद्र कुमावत, नितीन भंगाळे, जितेंद्र पाटील, अतुल महाजन, अतुल मालखेडे, सुनील सपकाळे, विवेक महाजन, दिनेश पाटील, दिलीप चौधरी उपस्थित होते..