रावेरातील रस्त्यांची कामे निकृष्ट दर्जाची : चौकशीची नागरिकांची मागणी

नगरपालिकेच्या अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष

रावेरातील रस्त्यांची कामे निकृष्ट दर्जाची : चौकशीची नागरिकांची मागणी

प्रतिनिधी / रावेर 

येथील नगरपालिकेतर्फे शहरात सुरु असलेल्या रस्त्यांची कामे निकृष्ट दर्जाची होत असल्याची तक्रार पंचमुखी हनुमान नगर परिसरातील रहिवाशांनी केली आहे. या कामाची क्वालिटी कंट्रोल विभागाच्या अधिकाऱ्यांकडून चौकशी करावी अशीही मागणी नागरिकांनी केली आहे.

रावेर नगरपालिकेतर्फे शहरात ठिकठिकाणी रस्त्यांच्या दुरुस्तीची, डांबरीकरणाची कामे सुरु आहेत. येथील जुना सावदा रस्त्यावरील पंचमुखी हनुमान मंदिरासमोर स्वामी विवेकानंद विद्यालयाकडे जाणाऱ्या दोन्ही रस्त्यांचे दंबरीकारां करण्यात येत आहे. या रस्त्यावर सुरुवातीला टाकलेल्या खडीची व्यवस्थित डबे करण्यात न आल्याने आठ दिवसांतच हि खडी रस्त्यावर विखुरली गेली होती. मात्र वाहनचालकांनी ओरड केल्यावर पुन्हा संबंधित ठेकेदाराने थातुरमातुर या खडीची दाबाई केली. या दोन्ही रस्त्यांची निकृष्ट दर्जाची व असमाधानकारक कामे होत असल्याने नगरपालिकेचा निधी वाया जाणार आहे. नगरपालिकेच्या मुख्याधिकारी व अभियंत्यांनी या कामाची चौकशी करून संबंधित ठेकेदारावर कारवाई करावी अशी मागणी होत आहे. तसेच या रस्त्यांच्या कामांची क्वालिटी कंट्रोल विभागाच्या अधिकाऱ्यांकडून चौकशी करण्याची मागणी समर्थ नगरातील नागरिकांनी केली आहे.