ड्रीप असोसिएशनच्या राज्य सहसचिवपदी सोपान पाटील
मुंबईत बैठक : दोन वर्षासाठी नवीन कार्यकारिणी
कृषीसेवक न्यूज नेटवर्क/रावेर
महाराष्ट्र राज्य ड्रिप असोसिएशनच्या मुंबई येथे झालेल्या बैठकीत संघटनेच्या राज्य सह सचिवपदी जळगाव जिल्हा ड्रीप असोसिएशनचे जिल्हाध्यक्ष व रावेर येथील तापी इरिगेशनचे संचालक सोपान पाटील यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे.
महाराष्ट्र राज्य ड्रीप असोसिएशनच्या मुंबई येथे झालेल्या बैठकीत आगामी दोन वर्षासाठी नवीन राज्य कार्यकारिणीची निवड करण्यात आली आहे. छत्रपती संभाजी नगर येथील विश्वास पाटील यांचा अध्यक्ष पदाचा कार्यकाळ संपल्याने नवीन कार्यकारिणीची निवड करण्यात आली आहे. असोसिएशनच्या अध्यक्षपदी सुदाम खोसरे (बीड) यांची तर उपाध्यक्षपदी प्रमोद बायस्कर (नागपूर)यांची निवड करण्यात आली आहे. संघटनेत सचिव भास्कर पवार सह सचिवपदी सोपान साहेबराव पाटील (रावेर) कोषाध्यक्ष पांडुरंग शिंदे, पश्चिम महाराष्ट्र व कोकण विभाग प्रमुख शैलेश लंबे (कोल्हापूर) उत्तर महाराष्ट्र विभाग प्रमुख विवेक भामरे (धुळे) मराठवाडा विभाग प्रमुख शिवाजी वायाळ (लातूर) संचालक रुपचंद टोपले,मार्गदर्शक विश्वास पाटील श्री माने सांगली यांचा कार्यकारिणीत सामावेश आहे.
तुषार, ठिबक सिंचन अनुदानसंबधी लॉटरी पद्धत बंद झाल्याचे जाहीर करण्यात आले. या निर्णयाची अंमलबजावणी व्हावी. प्रलंबित अनुदान केंद्र व राज्य हिस्सा त्वरित वितरीत करावा, या मागणीसाठी शासन स्तरावर संघटनेच्या माध्यमातून पाठपुरावा करण्यात येणार आहे.
सोपान पाटील, सहसचिव,महाराष्ट्र राज्य ड्रीप असोसिएशन