अवैध लाकडाच्या वाहतूक प्रकरणी वन विभागाची कारवाई

साडे तीन लाखांचा मुद्देमाल जप्त

अवैध लाकडाच्या वाहतूक प्रकरणी वन विभागाची कारवाई

कृषिसेवक न्यूज नेटवर्क/रावेर

वन विभागाचे अधिकारी व कर्मचारी गस्त घालत असताना लाकडाची वाहतूक करणाऱ्या ट्रकला थांबवून चौकशी केली असता त्यातून अवैध लाकडाची वाहतूक होत असल्याचे निष्पन्न झाले. याप्रकरणी ट्रक चालक शेख अन्वर शेख कडू रा. खानापूर याच्या विरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून जळावू लाकूड व ट्रक जप्त करण्यात आला आहे.

रावेर येथील वनपरिक्षेत्र अधिकारी अजय बावणे, फैजपूरचे वनआगार रक्षक सतीश वाघमारे व चालक विनोद पाटील हे फैजपूर यावल रस्त्यावर नियमित गस्त घालत असताना फैजपूर येथील फैजपूर येथील धनाजी नाना महाविद्यालयाजवळ संशयास्पद स्थितीत एक ट्रक मिळून आला. चालकाला थांबवून चौकशी केली असता त्यात विना परवाना जळावू लाकूड असल्याचे दिसून आले. वन अधिकाऱ्यांनी हा ट्रक ताब्यात घेतला असून चालक शेख अन्वर शेख कडू याच्या विरूद्ध भारतीय वनअधिनियम व महाराष्ट्र वन नियमावली अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. २६,६०० रुपयांचे १९ घन मीटर पांचारास जळाव वू लाकूड व ३,३०,००० रूपये किमतीचा ट्रक क्रमांक एमपी ०९ केसी ५५५९ असा एकूण ३,५६,६०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. ही कारवाई उपवनसंरक्षक यावल जमीर शेख व सहाय्यक वनसंरक्षक प्रथमेश हाडपे यांच्या मार्गदर्शनाखाली वनपरिक्षेत्र अधिकारी अजय बावणे यांनी केली आहे.