रावेर पीपल्स बँकेच्या निवडणुकीत लोकमान्य पॅनलचे वर्चस्व

सहकारला मिळाल्या सहा जागा

रावेर पीपल्स बँकेच्या निवडणुकीत लोकमान्य पॅनलचे वर्चस्व
रावेर पीपल्स बँकेच्या निवडणुकीसाठी रविवारी येथील गर्ल्स हायस्कूलच्या जिमखाना हॉलमध्ये सकाळी आठ वाजता मतमोजणीला सुरुवात झाली. अतीशय अटीतटीची व चुरशीच्या झालेल्या या निवडणुकीत लोकमान्य पॅनलने ७ जागांवर विजय मिळवला असून सहकार पॅनलला ६ जागा मिळाल्या आहेत. लोकमान्य पॅनलचे प्रमुख व सर्व साधरण मतदार संघाचे उमेदवार प्रल्हाद महाजन यांचा विजय झाला आहे. तर सहकार पॅनलचे प्रमुख व ओबीसी मतदार संघाचे उमेदवार ज्ञानेश्र्वर हरिभाऊ महाजन यांचा धक्कादायक पराभव झाला. निवडणुक निर्णय अधिकारी विजयसिंह गवळी तर बँकेचे व्यवस्थापक प्रकाश पाटील यांनी मतमोजणी पर्यवेक्षक म्हणून काम पाहिले. चौदा टेबलवर नियुक्त कर्मचाऱ्यांकडून मतमोजणीची प्रक्रिया करण्यात आली. दरम्यान अनुसूचित जाती जमाती मतदार संघातून पराभूत झालेले उमेदवार विकास अवसरमल यांनी पुनर मतमोजणीची मागणी केल्यावर तीन मतांचा फरक पडला. त्यापैकी दोन मते विनोद तायडे यांना वाढली तर अवसरमल यांचे एक मत वाढले. पूनर मत मोजनीत तायडे यांना विजयी घोषित केले.  
पॅनल प्रमुख महाजन यांनी सत्कार नाकारला 
लोकमान्य पॅनलने सात जागा मिळवीत बँकेच्या निवडणुकीत बहुमत मिळवले आहे. मात्र या पॅनलचे सात उमेदवार पराभूत झाल्याची खंत पॅनल प्रमुख प्रल्हाद महाजन यांनी व्यक्त केली. पॅनलच्या उमेदवारांचा पराभव झाल्यामुळे कार्यकर्त्यांनी सत्करासाठी आणलेले हार स्वीकारले नाही. मात्र कार्यकर्त्यांनी आग्रह धरल्याने निसटता पराभव झालेल्या विकास अवसरमल यांचा सत्कार यावेळी करण्यात आला. तसेच विवरा येथील दोन उमेदवार पराभूत झाल्याने लोकमान्य पॅनलकडून विजयी झालेल्या मानस कुलकर्णी यांनी मनाचा मोठेपणा दाखवत गावात होणाऱ्या सत्काराला नकार दिला. तशा  सूचना त्यांनी कार्यकर्ते व हितचिंतकांना दिल्या. लोकमान्य पॅनलचे प्रमुख प्रल्हाद महाजन हे सर्वाधिक २१८८ मते मिळवून विजयी झाले. तर याच पॅनलच्या विकास अवसरमल यांचा अवघ्या पाच मतांनी पराभव झाला.
लोकमान्य पॅनलचे विजयी उमेदवार:  कंसात मिळालेली मते
विमुक्त भटक्या जाती जमाती मतदार संघ : ऍड प्रवीण पाचपोहे( २१७२)
ओबीसी मतदार संघ : दिलीप हिरामण पाटील(२१३५) 
सर्वसाधारण मतदार संघ :
मानस अरुण कुलकर्णी(१७९५)
सोपान साहेबराव पाटील(१८३७)
प्रल्हाद रामदास महाजन(२१८८)
संजय गंगाधर वाणी(१७९४)
राजेश सुधाकर शिंदे(१७१६)
सहकार पॅनलचे विजयी उमेदवार :
अनुसूचित जाती जमाती मतदार संघ :
विनोद नारायण तायडे (१९१६)
महिला राखीव मतदार संघ :
पुष्पाबाई गणेश महाजन (१८९७)
मीराबाई चंपालाल राऊत(१८३५)
सर्वसाधारण मतदार संघ:
राजेंद्र पंढरीनाथ चौधरी(१७७१)
पंकज राजीव पाटील(१७२५)
सोपान बाबूराव पाटील(१९६२)